एक्स्प्लोर

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप

राम खाडे यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडला आहे.

मुंबई : राज्यातील मंत्री व आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असून गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर, मंत्री जयकुमार रावल यांच्यावरही माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता. राज्यातील नेतेमंडळींवर होत असलेल्या आरोपांवरुन विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. त्यातच, आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 34 एकर जमीन (Land) लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे आरोप करताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे. त्यामुळे, आता आमदार पडळकर आणि सरकार यावर काय उत्तर देते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राम खाडे यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडला आहे. त्यामुळे केवळ पडळकरच नव्हे, तर संबंधित माजी मंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खाडे यांनी केली आहे. खाडे यांनी औंध संस्थानमधील या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रे देखील माध्यमांना दाखवली आहे. त्यामुळे, आता याप्रकरणी गोपीचंद पडळकरांची भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, "हा थेट धार्मिक संस्थेच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणात मदत करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा," अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. 

पडळकरांनी मांडली भूमिका

धर्मादाय आयुक्तांकडे नोंद नसलेल्या जमिनी या राज्य सरकारची रीतसर परवानगी घेऊन त्याचा कर भरणा करुन वर्ग तीन ची जमीन वर्ग एक करून ती विक्री करता येते. हे प्रकरण जुने असून रीतसर परवानगी घेऊनच हा सगळा व्यवहार झाला आहे, असे स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात बोलताना दिले.

हेही वाचा

नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu: देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Dhairyasheel Mohite Patil: 'उद्या आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन'; आता खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल
'उद्या आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन'; आता खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Embed widget