एक्स्प्लोर
एसटी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटलं, 70 प्रवाशी असणारी बस रस्त्याच्या बाजूच्या खड्यात पलटी, 35 जखमी
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व प्रशासनाने मदतकार्य सुरु केले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र 35 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
Murbad Shahapur Accident
1/8

मुरबाड एसटी स्टँडवरून शहापूरला जाणाऱ्या बसचा कुडवली गावाजवळील एका वळणावर भीषण अपघात झालाय .
2/8

एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने 70 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाली .
3/8

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी 35 प्रवासी जखमी झाले आहेत .
4/8

बसमधील प्रवाशांच्या डोक्याला तसेच पायाला दुखापती झाल्या असून अनेकांना मुका मार लागला आहे .
5/8

धावत्या बसचे पाठ हे अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले .
6/8

अपघात झाल्याचे कळताच मुरबाड पोलीस व स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले .70 प्रवाशांना अपघातग्रस्त बस मधून सुखरूप बाहेर काढण्यात आले
7/8

जखमी प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश अधिक असून 35 जखमी प्रवासी प्रवाशांना मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
8/8

एसटी बसच्या दुरावस्थेकडे या अपघाताने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे . स्क्रॅपमधील गाड्या वापरल्या जातात का ?त्या वापरल्या जात असतील तर एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाची हेळसांड होतीय का असा सवाल प्रवासी विचारतासत .
Published at : 19 Mar 2025 05:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















