एक्स्प्लोर
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत पुणे विभागातील तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाला भेट दिली.
Student visit Mumbai vidhansabha
1/8

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत पुणे विभागातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाला भेट दिली.
2/8

पुण्यातील तांडा, वाड्या-वस्त्यावरील या विद्यार्थ्यांनी आज राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळाली. यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाचा होता.
3/8

राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक आश्रमशाळा चालवल्या जातात. याच उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 56 मुली आणि 44 मुलांनी विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज पाहिले.
4/8

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी शासनाच्या प्रयत्नांविषयी माहिती विद्यार्थ्यांना देताना विधिमंडळाचे कामकाज सांगितले.
5/8

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची व कुटुंबाची प्रगती साधत राष्ट्राच्या भल्यासाठी सकारात्मक योगदान देणारे सक्षम नागरिक बनावेत, हा शासनाचा प्रयत्न आहे असेही ते यावेळी म्हणाले.
6/8

या भेटीअगोदर विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. ही भेट विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरली, असे उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी सांगितले
7/8

दरम्यान, मुंबईत आणि त्यातही विधिमंडळात जे चेहरे आपण टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर पाहत होतो, ते मंत्री महोदयांचे चेहरे प्रत्यक्ष पाहूनही काही विद्यार्थी भारावून गेले होते.
8/8

मुंबईतील या भेटीत विद्यार्थ्यांकडून मंत्री अतुल सावे यांना भेटवस्तू देण्यात आली, ती मंत्री महोदयांनी आपुलकीने स्वीकारत आनंद व्यक्त केला
Published at : 19 Mar 2025 06:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग
























