Bhatghar dam News : पर्यटनानंतर आधी जीव सांभाळा! चौघे सहलीला आले अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...; भाटघर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. चार मित्र सहलीसाठी गेले होते यावेळी दोघांना पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे पाण्यात उतरले. खोलीचा अंदाज आला नाही आणि थेट पाण्यात बुडाला.
![Bhatghar dam News : पर्यटनानंतर आधी जीव सांभाळा! चौघे सहलीला आले अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...; भाटघर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू youth from punes hadapsar area drowns in bhatghar dam Maharashtra Marathi News Bhatghar dam News : पर्यटनानंतर आधी जीव सांभाळा! चौघे सहलीला आले अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...; भाटघर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/03/53df9414b389986c55209a4a960bac121693718856160442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणात (Bhatghar Dam) बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. चार मित्र सहलीसाठी गेले होते यावेळी दोघांना पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे पाण्यात उतरले. त्यातील एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. यामुळे काही वेळ मोठा गोंधळ उडाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य अशोक केदारे (24, रा.हांडेवाडी, सासानेनगर, हडपसर) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील हडपसर या परिसरात राहत होता. चार मित्र सहलीसाठी आले होते. शनिवारी सुट्टी असल्याने दोन मुलं आणि दोन मुली भाटघर धरणाच्या बॅक वॉटर येथे पर्यटनासाठी गेले. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. या घटनेबाबत राजगड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होत भोईराज जलआपत्ती पथकाला बोलावण्यात आले.
भाटघर धरणार बापलेकीचा मृत्यू...
काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील एका बापलेकीचा भाटघर घरणात बुडून मृत्यू झाला होता. ऐश्वर्या धर्माधिकारी (वय 13 वर्षे) असं मृत मुलीचं नाव आहे. तर शिरीष धर्माधिकारी (वय 45 वर्ष) यांचा शोध सुरु आहे. हे बाप-लेक पुण्यातील बालवाडीतील रहिवासी होते. सलग सुट्ट्या असल्याने बालेवाडीत राहणारे फालक आणि धर्माधिकारी कुटुंब 15 ऑगस्ट रोजी भोर तालुक्यातील जयतपाड गावातील मुंगळे रिसॉर्ट या ठिकाणी गेले होते. 15 ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास सर्व जण सीमा फार्म हाऊच्या मागे असणाऱ्या भाटघर धरणाचे बॅक वॉटर पाहायल गेले. त्यावेळी शिरीष धर्माधिकारी हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी मुलगी ऐश्वर्यालाही बोलावून घेतलं. शिरीष धर्माधिकारी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या हे भाटघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र खोल पाण्यात पोहत असताना दोघेही बुडाले.
पर्यटनानंतर आधी जीव सांभाळा...
पुण्याच्या आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळं आहे. त्यात अनेक स्थळं धोकादायकदेखील आहेत. सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी आणि कुटुंब पर्यटनासाठी जात असतात. मात्र पुढील ठिकाणाचा धोका लक्षात येत नसल्याने अशा घटना सातत्याने समोर येतात. अनेक ठिकाणी तरुण-तरुणी हुल्लडबाजीदेखील करताना दिसतात. हित हुल्लडबाजी अंगलट येते आणि परिणामी तरुणांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे तरुणांनी आणि पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबियांनी आधी जीव सांभाळावा, असं आवाहन वारंवार करण्यात येतं मात्र तरीही पर्यटकांची हुल्लडबाजी संपत नसल्याचं अशा घटनांमधून समोर येतं.
इतर महत्वाच्या बातम्या :
Pune Crime News : लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेला तरुण पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)