Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार उद्यापासून रंगणार; टीम इंडियाचा सामना कधी?, पाहा संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक
Champions Trophy 2025: भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी दुबईत खेळवण्यात येणार आहे.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) थरार उद्यापासून (19 फेब्रुवारी) रंगणार आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्चपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pak vs NZ) यांच्यात होणार आहे. हा सामना पाकिस्तानमधील कराची मैदानावर खेळवला जाईल. तर भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी दुबईत खेळवण्यात येणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दबदबा कायम-
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दबदबा कायम असल्याचे दिसत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 1998 मध्ये झाली. त्याचबरोबर ही स्पर्धा आठ वर्षांनी पुनरागमन करणार आहे. शेवटच्या वेळी ही स्पर्धा 2017 मध्ये झाली होती. त्यावेळी फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता. टीम इंडिया या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने आतापर्यंत 29 सामने खेळले असून 18 सामने जिंकले आहेत. दोन वेळा अंतिम फेरी गाठूनही भारतीय संघाने या स्पर्धेत जेतेपद गमावले आहे. 2000 मध्ये भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. तर गेल्या वेळी पाकिस्तानचा पराभव झाला होता.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळापत्रक- (ICC Champions Trophy 2025 Schedule)
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
अंतिम आणि उपांत्य फेरीचे सामने कुठे होणार -
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च - अंतिम - गद्दाफी स्टेडियम, लाहोर (टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचल्यास ठिकाण दुबई असेल)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव.
राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.
आयसीसीने पेटारा उडला, विजेत्या संघाला किती रुपये मिळणार?
आयसीसीने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे, ज्यामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी माहिती दिली आहे की 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत यावेळी बक्षीस रकमेत 53 टक्के वाढ करण्यात आली आहे. आयसीसीने संपूर्ण स्पर्धेसाठी 6.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 60 कोटी रुपये) बक्षीस रक्कम ठेवली आहे. जर आपण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आयसीसीने जाहीर केलेल्या बक्षीस रकमेवर नजर टाकली तर, स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला सुमारे 19.50 कोटी रुपये मिळतील. अंतिम सामन्यात उपविजेत्या संघाला सुमारे 10 कोटी रुपये मिळतील. याशिवाय, उपांत्य फेरीतून बाहेर पडणाऱ्या संघांना अंदाजे 5-5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देखील दिली जाईल.
संबंधित बातमी:
मुंबईविरुद्ध पहिल्या दिवसअखेर विदर्भाने रचला ५ बाद ३०८ धावांचा डोंगर, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
