Chhaava Movie Ticket Sales: 'छावा'चा धुरळा, तिकीटंच मिळेनात... 24 तास शो चालवूनही हाऊसफुल्ल, 'धाकल्या धनीं'ना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी साऱ्यांचीच धडपड
Chhaava Movie Ticket Sales: 'छावा'चे सगळेच्या सगळे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. त्यामुळे अनेक थिएटर्सनी मध्यरात्रीचे आणि पहाटेचे शो सुरू केले आहेत.

Chhaava Movie Blockbuster Ticket Sales: बहुचर्चित 'छावा' सिनेमा (Chhaava Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आणि त्यानं धुरळाच उडवून दिला. स्वराज्याच्या धाकल्या धनींना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या (Maharashtra News) मायबाप जनतेनं थिएटरमध्ये गर्दी केली. चित्रपट पाहून कुणी भावूक झालं, तर कुणी भारावून गेलं. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, त्यांचं बुद्धीचातुर्य पाहून प्रत्येकाचं मन गर्वानं फुलून गेलं. हे आम्ही नाहीतर चित्रपटाच्या कमाईचे समोर येणारे आकडे आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ सांगत आहेत. अशातच चित्रपटासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी पाहून आता मात्र, थिएटर मालकांची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'छावा'ची क्रेझ इतकी आहे की, थिएटर्सनी 24 तास शो सुरू केलेत आणि सगळेच्या सगळे हाऊसफुल्ल सुरू आहेत.
'छावा'चे सगळेच्या सगळे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. त्यामुळे अनेक थिएटर्सनी मध्यरात्रीचे आणि पहाटेचे शो सुरू केले आहेत. 'छावा'चं ऑनलाईन तिकीट बुक करायला गेल्यावर कुठे रात्री 1 वाजताचा, तर कुठे पहाटे 5 वाजताचा शो दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या शोचीसुद्धा तिकीटं भरभर विकली जात आहेत. पुण्यातील सातारा रोडवरील सिटी प्राईड थिएटरमध्ये रविवारी मध्यरात्री 12.50 वाजता आणि पहाटे 5.50 मिनिटांनी शो ठेवला होता. अशा पद्धतीनं राज्यभरातील काही इतर थिएटर्समध्येही मध्यरात्री आणि पहाटे शो ठेवण्यात आले आहेत.
'छावा' चित्रपटाला देशातूनच नाहीतर परदेशातूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विक्की कौशलचे चाहते भरभरून कौतूक करताना दिसत आहेत. प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून विक्की कौशलही भारावून गेला. त्यानंतर त्यानं सोशल मीडयावर आभार व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली. 'छावा'ला मिळणाऱ्या यशाबाबत आनंद व्यक्त करत, त्यानं सर्वांचे आभार मानले आहेत. त्यानं लिहलं आहे की, "तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून माझं मन भरुन आलं आहे. सर्वांचे खूप खूप आभार..."
View this post on Instagram
'छावा'नं चार दिवसांतच वसूल केलं भांडवल
'छावा'नं पहिल्या दिवशी 33.1 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 39.30 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे एकूण आठवड्याच्या शेवटी 121.43 कोटी रुपये कमावले होते. बॉक्स ऑफिस कलेक्शनची अपडेट देणाऱ्या सॅकनिल्क या वेबसाईटनुसार, छावानं सोमवारी सकाळी 10:30 वाजेपर्यंत 24.00 कोटी रुपये कमावले होते आणि एकूण 145.43 कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान, हे अंतिम आकडे नाहीत. काही वेळात हे आकडे अपडेट होतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
