एक्स्प्लोर

सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा

आज सोयाबीनच्या (Soybean) सरकारी खरेदीचा शेवटचा दिवस आहे. याच मुद्यावरुन शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आक्रमक झाले आहेत.

Ravikant Tupkar : आज सोयाबीनच्या (Soybean) सरकारी खरेदीचा शेवटचा दिवस आहे. आजच्या या शेवटच्या दिवशीही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होणं बाकी आहे. याच मुद्यावरुन शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आक्रमक झाले आहेत. सोयाबीन खरेदीला एक महिना मुदत वाढ द्या, अन्यथा राहिलेले सोयाबीन मुंबईतील अरबी समुद्रात फेकून देऊ असा इशारा रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. 

सरकारने फक्त 7 ते 8 लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी केलं

अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे. राज्याचे सोयाबीनचे उत्पादन हे 60 ते 65 लाख मेट्रीक टन आहे. त्यातील सरकार 13 लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करणार आहे. त्यातील सरकारने फक्त 7 ते 8 लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी केलं आहे. राहिलेलं सोयाबीन आम्ही कुठं फेकायचं? असा सवाल तुपकर यांनी केला आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी आहे? असा सवालही त्यांनी केला. ज्या संस्थाची अवकात नाही, त्या संस्थाना सोयाबीन खरेदी करण्याचे अधिकार दिले असल्याचे तुपकर म्हणाले.  सोयाबीन खरेदी करणाऱ्या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. यांनी खाली लोकं नेमले आहेत. आचारसंहितेच्या काळात राज्याचे पणन सचिव आणि पणनचे संचालक यांनी घोळ घातला आहे. ज्या संस्थाची औकात नाही, त्यांना सोयाबीन खरेदीचे टेंडर दिले जात असल्याचे तुपकर म्हणाले. 

अकोला जिल्ह्यातील 1 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी

आज सोयाबीनच्या सरकारी खरेदीचा शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशीही अकोला जिल्ह्यातील1 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी आहे. जिल्ह्याला साडेनऊ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यापैकी साडेआठ लाख क्विंटल सोयाबीन आतापर्यंत खरेदी करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमी केंद्राच्या माध्यमातून खरेदीसाठी अंतिम मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. आज अकोल्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर 3800 ते 4000 रुपयापर्यंत घसरलेत. हमी केंद्रावर सोयाबीनला 4851 रुपये क्विंटलचा दर आहे. त्यामुळं या केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. परंतु, अजूनही शेतकऱ्यांचे  सोयाबीनची खरेदी बाकी आहे. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सोयाबीनची खरेदी करा अन्यथा प्रतिक्विंटल सोयाबीनसा 3000 रुपये द्या अशी मागणी देखील तुपकरांनी केली.

सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अडचणी

विक्रीसाठी नोंदणी न होणे 
सोयाबीनची प्रतवारीचे कारण सांगून परत पाठवणे
पीक पेऱ्यावर सोयाबीनची नोंद नसणे परत पाठविणे
नोंदणी केंद्र कुठे आहेत याची सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नाही
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नोंदणी कशी करायची याचे ज्ञान नसणे

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Mayor Bungalow: रितू तावडेंचा राजालाही लाजवेल असा थाट, महापौर बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी पैशांची वारेमाप उधळपट्टी थांबेना, 3 कोटींचं नवं टेंडर काढलं
रितू तावडेंचा राजालाही लाजवेल असा थाट, महापौर बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी पैशांची वारेमाप उधळपट्टी थांबेना, 3 कोटींचं नवं टेंडर काढलं
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Siddhivinayak Mandir : मोठी बातमी! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून सखोल चौकशीचे आदेश; दोषी आढळ्यास कारवाईचा बडगा!
मोठी बातमी! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून सखोल चौकशीचे आदेश; दोषी आढळ्यास कारवाईचा बडगा!

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Embed widget