एक्स्प्लोर
Shankar Mandekar: हत्तीवरून मिरवणूक काढणे भोवले, अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गुन्हा दाखल; पण परवानगी घेतली होती का?
Shankar Mandekar: हत्तीवरून मिरवणूक काढल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याची माहिती आहे.

Shankar Mandekar
1/6

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे यश साजरं करण्यासाठी पिरंगुटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची हत्तीवरून काढलेली मिरवणूक आणि पेढेवाटप भोरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर (shankar mandekar) यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडलं आहे.
2/6

हत्तीवरून मिरवणूक काढल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याची माहिती आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने शंकर मांडेकर (shankar mandekar) यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.
3/6

शंकर मांडेकरांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे मांडेकर (shankar mandekar) यांची हत्तीवर मिरवणूक काढली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
4/6

आमदार शंकर मांडेकर यांच्या मिरवणूकीत हत्ती पाठवण्याच्या सरकारच्या सर्व परवानग्या संस्थानने घेतल्या होत्या. आमच्याकडून कोणताही कायदा मोडण्यात आलेला नाही, तासगावच्या श्री गणपती पंचायतन संस्थांनचे अध्यक्ष राजेंद्र पटवर्धन यांनी आपली भूमिका मांडली आहे.
5/6

शंकर मांडेकर यांची रविवारी पिरंगुट गावात मिरवणूक काढण्यात आली. पेढे वाटण्यात आले, जंगी उत्साह साजरा करण्यात आला.
6/6

या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावरती चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
Published at : 05 Feb 2025 03:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
