Champions Trophy 2025 Team India : टीम इंडियाचे स्टार फॉर्ममध्ये! सराव सत्रात षटकार-चौकारांचा पाऊस, व्हिडिओ पाहून पाकिस्तानी खेळाडूंना फुटला घाम
सोमवारी दुबईमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू सरावासाठी मैदानावर उतरले. यादरम्यान, रोहित आणि पांड्याने तुफानी शैलीत फटकेबाजी करत होते.

India vs Bangladesh Dubai : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. रविवारी आणि सोमवारी दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये संघाने कठोर सराव केला. या स्पर्धेत संघाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. सोमवारी दुबईमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू सरावासाठी मैदानावर उतरले. यादरम्यान, रोहित आणि पांड्याने तुफानी शैलीत फटकेबाजी करत होते.
विराटसोबत, गिल आणि श्रेयस अय्यर यांनीही गाळला घाम
खरंतर बीसीसीआयने एक्स वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू सरावासोबतच मस्ती करताना दिसले. रोहित शर्माने नेटमध्ये खूप घाम गाळला. त्याने अनेक गोलंदाजांचा सामनाही केला. रोहित फिरकी गोलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाजांविरुद्धही खेळताना दिसला. शुभमन गिल आणि विराट कोहली यांचे नेट सेशनमध्ये चांगली फटकेबाजी केली. यावेळी कोहलीने गिलला अनेक टिप्सही दिल्या. स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यरनेही खूप घाम गाळला. हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये दिसत होता. फलंदाजी करताना त्याने मोठ्या हिट्सवर काम केले. टीम इंडियाच्या फलंदाजांची एकूण कामगिरी उत्कृष्ट होती. त्यामुळे नक्कीच पाकिस्तानी खेळाडूंना घाम फुटला असेल.
फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच खेळाडूंनी क्षेत्ररक्षणावरही काम केले. यावेळी, भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ खेळाडूंसोबत दिसला. वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा मैदानावर एकत्र दिसले. भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात स्थान देण्यात आले आहे. स्पर्धेचे दोन उपांत्य सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील. अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाईल.
Raw mode 🔛
— BCCI (@BCCI) February 17, 2025
Presenting 𝙎𝙤𝙪𝙣𝙙𝙨 𝙤𝙛 𝙏𝙧𝙖𝙞𝙣𝙞𝙣𝙜 🔊 from #TeamIndia's first practice session of #ChampionsTrophy 2025 in Dubai 😎
WATCH 🎥🔽
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटची कामगिरी
भारतीय संघ सध्या नेटमध्ये घाम गाळत आहे. कोहली देखील आपले आकर्षण पसरवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. कोहलीने आतापर्यंत 2009, 2013 आणि 2017 मध्ये तीन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्या आहेत. या काळात त्याने 13 सामन्यांमध्ये 88 पेक्षा जास्त सरासरीने 529 धावा केल्या आहेत आणि त्यात 5 अर्धशतके आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव.
राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
