Maharashtra Live Updates: जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का, निकटवर्तीयांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Maharashtra Live blog Updates: महाराष्ट्र आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील राजकारणात शिंदे आणि फडणवीसांचं कोल्ड वॉर चर्चेत
LIVE

Background
उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही : पंकज भोयर
उद्धव ठाकरे यांनी भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे, असे वक्तव्य केले होते. यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. ते तणावामध्ये असल्याने असे वक्तव्य करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का, निकटवर्तीयांनी सोडली साथ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय. आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय अभिजीत पवार, हेमंत वाणी आणि सीमा वाणी यांनी आव्हाडांची साथ सोडली आहे. या तीन नेत्यांची थोड्याच वेळात मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कदाचित राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे एकेकाळचे खंदे कार्यकर्ते आनंद परांजपे यांच्यानंतर आता अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी देखील आव्हाडांची साथ सोडली.
जळगाव जिल्ह्यात आढळला 'जीबीएस'चा तिसरा रुग्ण
जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका तीन वर्षीय बालकाला जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) बालरोग विभाग अतिदक्षता वॉर्डात उपचार सुरू आहे. या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले असून. महिला रुग्णाला डिस्चार्ज दिला, तर रावेरच्या तरुणावर उपचार सुरू असून त्याची तब्येत सुधारत आहे. या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत असल्याने रक्त तपासणी केली असता जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर तत्काळ बालरोग तज्ञांनी उपचार सुरू केले. एकाच महिन्यात हा तिसरा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
Vaibhav Naik : माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का
सिंधुदुर्ग : माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलाय. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय, असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
Dhule Crime : लाखो रुपयांच्या दहा मोटरसायकलींसह सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात
धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरात एका सराईत मोटारसायकल चोरट्याला दहा मोटारसायकलींसह अटक केली आहे. पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराम भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून 3 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथून दीपक नंदू वंजारी यांची चोरी गेलेली हिरो कंपनीची मोटारसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही कारवाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
