एक्स्प्लोर
Chhaava Movie Review: 'छावा' बघून थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर कपाळावर चंद्रकोर लावलेला तरुण ढसाढसा रडला
Chhaava Movie: छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे.

Chhaava Movie
1/14

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर आधारित छावा चित्रपट (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
2/14

छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे.
3/14

छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही, त्यांना आता प्रचंड उत्सुकता लागली आहे.
4/14

छावा चित्रपट सुरु असताना चित्रपटगृहातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचदरम्यान एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे.
5/14

चित्रपटगृहातून छावा चित्रपट पाहिल्यानंतर कपाळावर चंद्रकोर असलेला तरुण ढसाढसा रडला.
6/14

छावा चित्रपट पाहून बाहेर पडल्यानंतर एका तरुणाला चित्रपट कसा होता?, असे विचारण्यात आले. यावर चित्रपट चांगला वाटला. पण जर तुमच्या देवाला (छत्रपती संभाजी महाराजांना) सगळ्यांसमोर मारण्यात आले. मग कसं वाटणार?, असं हा तरुण म्हणाला.
7/14

छावा चित्रपट खूप चांगला आहे, प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहायला हवा...विकी कौशलने चांगली भूमिका निभावली आहे, असंही त्याने सांगितले.
8/14

छावा चित्रपट पाहणाऱ्यांना मी नक्की सांगेन की,आपण मराठा आहोत, हे लक्षात ठेवा...आपल्याला भाग्याने डोक्यावर चंद्रकोर लावण्यास मिळालं आहे , असं म्हणत तरुण ढसाढसा रडू लागला.
9/14

छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे.
10/14

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसुबाई भूमिका साकारली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाने केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
11/14

अक्षय खन्नाने देखील औरंगजेबची भूमिका केली आहे. अक्षय खन्नाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे.
12/14

अभिनेता अजय देवगण याने या चित्रपटात दिलेला व्हॉईसओव्हर (नरेशन) चर्चेचा विषय ठरत आहे.
13/14

चित्रपटाच्या कमाईशी संबंधित अधिकृत आकडेवारीनुसार, 'छावा'नं पहिल्या दिवशी 33.1 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 39.30 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे एकूण आठवड्याच्या शेवटी 121.43 कोटी रुपये कमावले.
14/14

छावा चित्रपटात मराठी कलाकारांची फौज आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, नीलकांती पाटेकर, शुभंकर एकबोटे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Published at : 18 Feb 2025 08:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion