एक्स्प्लोर
Share Market Update : एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा चित्र बदललं, शेअर बाजारात घसरण सुरु
Share Market Update News : भारतीय शेअर बाजार सोमवारी तेजीसह सुरु झाला होता. त्यापूर्वी सलग 8 दिवस घसरण सुरु होती. आज संमिश्र स्थिती पाहायला मिळतेय.

शेअर मार्केट अपडेट
1/6

भारतीय शेअर बाजार आज खुला झाला तेव्हा सुरुवातीला तेजी पाहायला मिळाली त्यानंतर मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
2/6

गेल्या आठ दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होती. मात्र, काल शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारासाठी आजचा दिवस संमिश्र असल्याचं दिसून येतं. गिफ्ट निफ्टी 23050 अंकांवर ट्रेड करत होता.
3/6

निफ्टी 50 22934.20 अंकांवर ट्रेड करत आहे. तर सेन्सेक्समध्ये तेजी आणि घसरण सुरु आहे. सेन्सेक्सनं 76025 पर्यंत मजल मारली आहे.
4/6

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2900 डॉलर प्रति औंस ला मिळतेय. देशातंर्गत बाजारात सोन्याच्या दरात 400 रुपयांच्या वाढीसह 85000 रुपयांवर पोहोचलं आहे. तर चांदीचे दर 95600 रुपयांवर स्थिर आहे.
5/6

भारतीय शेअर बाजारातून ऑक्टोबर पासून विदेशी गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. या काळात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शेअर बाजार सावरल्याचं पाहायला मिळतंय. बँक निफ्टीमध्ये देखील 141 अंकांची घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात सातत्यानं घसरण होत असल्यानं गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागत आहे.
6/6

शेअर बाजारात आज भारतीय एअरटेल च्या शेअरमध्ये मोठ्या घडामोडी होऊ शकतात. प्रमोटर्स 4.82 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. एबीबी कंपनीनं तिसऱ्या तमिहाती चांगली कामगिरी केलीय. तर क्वालिटी पॉवर आयपीओ देखील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 18 Feb 2025 10:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
