एक्स्प्लोर

Pune: पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...

Pune : केवळ मांसाहार खाल्ल्यानेच जीबीएस होतो असं बोलणं वावगं ठरेल. किंबहुना काही अंशी ते खरं देखील आहे. त्यामुळे दूषित मांस किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळा असा सल्ला डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.

पुणे : गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) अर्थात जीबीएस (GBS) हा रोग कुठल्याही जंतू पासून किंवा बॅक्टेरिया आणि वायरस पासून होत नाही. तर काही विषाणू अन्नपदार्थातून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार जास्त होण्याची शक्यता असते. दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच कारणामुळे GBS आजार होतो हे निष्पन्न झाल आहे. मात्र केवळ मांसाहार खाल्ल्यानेच जीबीएस होतो असं बोलणं वावगं ठरेल. किंबहुना काही अंशी ते खरं देखील आहे. त्यामुळे दूषित मांस किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळा असा सल्ला पुण्यातील डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.

कोंबडी खाणाऱ्याला प्रत्येकाला GBS ची लागण होईल असं नाही- डॉ.अविनाश भोंडवे

जीबीएस होऊ नये म्हणून केवळ शिजवलेलं मांस खा, असेही डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले. जर जीबीएसचा जिवाणू कोंबड्यांमध्ये असेल तरच माणसाला याची लागण होऊ शकते, पण प्रत्येक कोंबडी खाणाऱ्याला याची लागण होईल, असं नाही. तसेच GBS विषाणूमुळे प्रत्येक व्यक्तीला हा आजार होईल असंही नसल्याचे डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले. 

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची माहिती:

* गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार (Auto immune) स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्‍थांवर  (peripheralnervous system) हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो.
 
* गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्यरोग नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
 
* गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच GBS ची इतर अनेक कारणे असतात
 
* गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे १ लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्‍णालये / वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला 'जीबीएस' चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे :

* अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
* अचानकपणे उद्भवलेला चालण्‍यातील त्रास किंवा अशक्तपणा
* जास्‍त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप

नागरिकांनी घ्यावयाची काळजी :

* पिण्याचे पाणी उकळून प्‍यावे
* स्वच्छ व ताजे अन्न खावे
* शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये 
* वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
* हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हे ही वाचा 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas Shortage Maharashtra: गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
Maharashtra Live blog updates: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Maharashtra Live blog updates: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Rasgulla Choking Death : रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वास गुदमरून एकाचा दुर्दैवी मृत्यू; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला
रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वासही घेता येईना; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला, झारखंडच्या जमशेदपुरमधली धक्कादायक घटना
Virat Kohli RCB Playing XI : गेल, राहुल, चहल IN, मोहम्मद सिराज OUT...; विराट कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
गेल, राहुल, चहल IN, सिराज OUT...; कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
LPG Gas Shortage Maharashtra: गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
Embed widget