Zero Hour | Maharashtra Kesari | Pruthviraj Mohol चं पुढचं लक्ष्य कोणतं? महाराष्ट्र केसरी 'माझा'वर!
Zero Hour | Maharashtra Kesari | Pruthviraj Mohol चं पुढचं लक्ष्य कोणतं? महाराष्ट्र केसरी 'माझा'वर!
अहिल्यानगरात आयोजित महाराष्ट्र केसरीचं नुकतंच सूप वाजलं. या महाराष्ट्र केसरीची फायनल रविवारी खेळवण्यात आली. मंडळी, फायनल झाली. महाराष्ट्र केसरीचा मानही पृथ्वीराज मोहोळला मिळाला. पण किताबाच्या कुस्तीआधी मॅटवरच्या फायनलमध्ये झालेल्या वादानं महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं. आणि त्या वादात पंचांची चूक असली किंवा नसली तरी त्याची झळ पृथ्वीराज मोहोळला बसली. महाराष्ट्राच्या कुस्तीत पुणे जिल्ह्यातल्या मुठा गावच्या मोहोळ कुटुंबाची पुण्याई मोठी आहे. मामासाहेब मोहोळांपासून अमृता मोहोळ आणि अमृता मोहोळांपासून राजेंद्र मोहोळ, सागर मोहोळ, सचिन मोहोळ, महेश मोहोळ अशी नावं कुस्तीरसिकांना चांगलीच परिचयाची आहेत. त्याच मोहोळ घराण्याची नातं सांगणारा, राजेंद्र मोहोळांचा लाडका लेक महाराष्ट्र केसरीची ही गदा जिंकून आज झीरो अवरच्या व्यासपीठावर आला आहे. पृथ्वीराजसोबत त्याचे वडील राजेंद्र मोहोळ उर्फ राजाभाऊही झीरो अवरमध्ये सहभागी झाले आहेत. त्या दोघांचंही एबीपी माझाच्या स्टुडिओत स्वागत. सुरुवात करुयात आजच्या गप्पांना.
All Shows

































