एक्स्प्लोर

Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?

Nashik Crime : सध्या मालेगावसह राज्यभरात बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गाजत असतानाच नाशिक पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Nashik Crime : सध्या मालेगावसह राज्यभरात बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गाजत आहे. अलीकडेच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यातच आता  नाशिक पोलिसांनी (Nashik Police) बांगलादेशी नागरिकांविरोधात (Bangladeshi citizens) मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या नाशिकमध्ये राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, बांगलादेशी नागरिकांविरोधात राज्यात सर्वत्र कारवाई सुरू असताना नाशिक पोलिसांनी बांधकाम साईटवरून  8 बागलदेशी नागरिकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे नाशिक पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर मजूर सुपरवायझरचे काम करत होते. चार-पाच दिवस पोलिसांनी बांधकाम साईटवर मजुरी करतानाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. 

पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून भारतात प्रवेश?

त्यातील 3 जणांकडे आधारकार्ड पॅनकार्ड आढळून आले आहेत. नाशिक व्यतिरिक्त  इतर जिल्ह्यातून त्यांनी आधारकार्ड मिळवले आहेत. 8 पैकी 1 जण मागील 12 वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास आहे. तर इतर जण काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आले आहेत. या बांगलादेशी नागरिकांना भारतात पाठविणारे रॅकेट असून पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून भारतात प्रवेश करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या नागरिकांना आश्रय देणारे, बनावट कागदपत्रे देणारे आणि नोकरी देणाऱ्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे. 

'हे' आठ बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात

  • सुमन कालाम गाझी (27)
  • अब्दुला अलीम मंडल (30) 
  • शाहीन मफिजुल मंडल (23)
  • लासेल नुरअली शंतर (23)
  • आसाद अर्शदअली मुल्ला (30) 
  • आलीम सुआनखान मंडल (32) 
  • अलअमीन आमीनुर शेख (22) 
  • मोसीन मौफीजुल मुल्ला (22) 

यांनी केली कारवाई 

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रविण माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण,  किशोर देसले,  बाळु बागुल, नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार गणेश वाघ, समिर चंद्रमोरे,  मनिषा जाधव, वैशाली घरटे, अतुल पाटील,  गौरख खांडरे, युवराज कानमहाले यांच्या पथकांनी केली. 

आणखी वाचा 

Nashik Crime : नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Fraud Dombivli : 'महानगर गॅस'चा कर्मचारी बोलतोय! ‘गॅस कनेक्शन अपडेट’च्या नावाखाली कापड व्यापाऱ्याची 14 लाखांची फसवणूक
'महानगर गॅस'चा कर्मचारी बोलतोय! ‘गॅस कनेक्शन अपडेट’च्या नावाखाली कापड व्यापाऱ्याची 14 लाखांची फसवणूक
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Crime News: फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget