Team India Dubai Pitch : पाकिस्तानच्या नाकाखाली खेळला गेला मोठा गेम... टीम इंडिया दुबईत येताच बदलली खेळपट्टी! वाद पेटणार?
Champions Trophy 2025 : बीसीसीआय मुख्य निवडकर्त्यांनी पाकिस्तान आणि यूएई येथे होणाऱ्या आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

Ind vs Pak Dubai Pitch Champions Trophy 2025 : बीसीसीआय मुख्य निवडकर्त्यांनी पाकिस्तान आणि यूएई येथे होणाऱ्या आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. जेव्हा भारतीय संघाने 5 फिरकी गोलंदाज निवडले, तेव्हा सर्वांनी त्यावर टीका केली की अलिकडेच दुबईमध्ये वेगवान गोलंदाज चांगले यशस्वी ठरले होते. त्यामुळे या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, टीम इंडिया 15 फेब्रुवारी रोजी दुबईला रवाना झाली. तिथे पोहोचताच त्याने विश्रांती घेण्याऐवजी सराव करण्याचा निर्णय घेतला. आता बातमी अशी आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला दुबईच्या संथ खेळपट्ट्यांशी संघर्ष करावा लागणार नाही. वृत्तानुसार, भारताच्या लीग सामन्यांसाठी दोन नवीन खेळपट्ट्या तयार ठेवण्यात आल्या आहेत.
भारत 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर 23 फेब्रुवारी रोजी त्यांचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. शेवटी गट टप्पा 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध संपेल. हे तिन्ही सामने दुबईमध्ये होतील, जिथे गेल्या एका महिन्यात खुप क्रिकेट खेळले गेले आहे. गेल्या वर्षी महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर दुबईने अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणारा पुरुषांचा 19 वर्षांखालील आशिया कप आणि आयएलटी-20 लीगचा समावेश आहे.
आयएलटी-20 दरम्यान या मैदानावर 15 सामने खेळल्या गेले, ज्यात दोन नॉकआउट सामने पण होते. पण, आता असे वृत्त आहे की, स्टेडियममधील दहापैकी दोन खेळपट्ट्या लीग दरम्यान जाणूनबुजून वापरल्या गेल्या नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्या चांगल्या राहावेत म्हणून ठेवल्या होत्या. एका सूत्राने पीटीआयला सांगितले, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 10 सामन्यांच्या पट्ट्या आहेत. लीग स्टेज दरम्यान सूचना देण्यात आली होती की, त्या दोन्हीचा वापर आता केला जाणार नाही आणि त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ताजे ठेवावे लागेल. कारण खेळपट्टी जास्त वापरानंतर ते मंदावणार नाही याची खात्री करण्यासाठी हे केले आहे. ताजी खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच मदत करेल.
ऐतिहासिकदृष्ट्या, दुबईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी भरपूर विकेट्स घेतल्या आहेत, परंतु यावेळी नवीन खेळपट्टी बॅट आणि बॉलमध्ये योग्य संतुलन राखेल अशी अपेक्षा आहे. भारताने या स्पर्धेसाठी पाच फिरकीपटूंची निवड केली आहे. गेल्या आठवड्यात, यशस्वी जैस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीचा 15 जणांच्या संघात समावेश करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान चक्रवर्तीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इतर चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
संघात पाच फिरकीपटू आहेत. त्यामुळे, नवीन खेळपट्ट्या त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः वेगवान गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूंसाठी. वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नवीन खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत, प्रेक्षकांना बॅट आणि बॉलमधील संतुलित स्पर्धा पाहण्याची अपेक्षा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे गट
गट अ - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
गट ब - दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक
20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध बांग्लादेश
23 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान
2 मार्च - भारत विरुद्ध न्यूझीलंड
(हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होतील)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

