एक्स्प्लोर

Nashik News : बागलाणच्या सुपुत्रावर काळाचा घाला; सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू 

Nashik News : बागलाण (Baglan) तालुक्यातील सौंदाणे येथील जवान साहेबराव सोनवणे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) अनेक जवान सीमेवर कार्यरत आहेत. मागील काही महिन्यात अनेक जवानांना वीरमरण आले आहे. अशातच जिल्ह्यातील जवानांच्या अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशातच साक्री ते शिर्डी या महामार्गावर ट्रॅक्टर आणि मोटरसायकल (Accident) यांच्यात झालेल्या अपघातात एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

बागलाण (Baglan) तालुक्यातील सौंदाणे येथील भारतीय सैन्यात असलेले जवान साहेबराव सोनवणे (Sahebrao Sonvane) यांचा अपघाती मृत्यू (Accident Death) झाला आहे. छत्तीसगड राज्यातील एका आर्मी कॅम्पमध्ये जवान सोनवणे हे कार्यरत होते. दरम्यान, ते नुकतेच दोन दिवसांपूर्वीच आठ दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते. काल सकाळीच काही कामानिमित्त ते दासवेल गावी राहत असलेल्या मामाला भेटायला गेले होते. सायंकाळपर्यंत काम आटोपून सात वाजेच्या सुमारास ते आपल्या मोटर सायकलने परतत होते. अशातच साक्री शिर्डी महामार्गावर असताना बागलाण तालुक्यातील आव्हाटी परिसरात अपघात झाला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

साक्री शिर्डी महार्गावरून घरी परतत असताना याचवेळी कांद्याने भरलेला ट्रॅक्टर सटाणा येथे जात होता. कांद्याच्या भरलेला ट्रॅक्टरला जवान सोनवणे हे ओव्हरटेक करत असतांना अचानक ट्रॅक्टर चालकाने वळण घेतल्याने हा अपघात झाला आहे. यात जवान साहेबराव सोनवणे यांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली आल्याने ते मागच्या चाकात गेले. यात ते गंभीर जखमी झाले. लागलीच स्थानिक वीरगाव फाट्यावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कांद्याच्या ट्रॉलीखाली अडकून पडलेल्या जवानास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. काही वेळातच त्यांना बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी सटाणा शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने अगंभीर जखमी झाले होते. रक्तश्रावही अधिक झाला होता. त्यामुळे जवानावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पुरेसा वेळ मिळाला नाही. आणि अपघातात भारतीय जवानाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ दाखल झाले होते. मात्र जवानाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. सौंदाणे गावात ही बातमी कळताच गावावर शोककळा पसरली असून सोनावणे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक भारतीय जवान सैन्यदलात कार्यरत आहेत. सहा महिन्याच्या वर्ष भराच्या कामानंतर ते सुट्टीनिमित्त गावी येतात. अशावेळी या सुट्टीच्या दिवसात कुटुंबासह नातेवाईक, मित्रमंडळींना वेळ देतात. हेच दिवस आपल्या कुटुंबाबासोबत आनंदाचा क्षण साजरा करण्याचे, मात्र अशा पद्धतीने अपघात होऊन जवानाच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. जवान सोनवणे हे देखील आठ दिवसाच्या सुट्टीवर आले होते. मामाला भेटण्यासाठी गेले, मात्र त्याचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी सिन्नर परिसरातही अशाच पद्धतीने जवानाचा मृत्यू झाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO Claim Settlements: ईपीएफओनं इतिहास रचला, 10 महिन्यात  5 कोटी दावे मंजूर, 2 लाख कोटी रुपये खातेदारांच्या खात्यात वर्ग
ईपीएफओची दमदार कामगिरी, 5 कोटी दावे मंजूर करत विक्रम, 2 लाख कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा
Rahul Gandhi : पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
Nashik Crime : नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
Rahul Gandhi : राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकारSantosh Bangar on Uddhav Thackeray : 2-3 दिवसात ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होईलABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 07 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सThackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO Claim Settlements: ईपीएफओनं इतिहास रचला, 10 महिन्यात  5 कोटी दावे मंजूर, 2 लाख कोटी रुपये खातेदारांच्या खात्यात वर्ग
ईपीएफओची दमदार कामगिरी, 5 कोटी दावे मंजूर करत विक्रम, 2 लाख कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा
Rahul Gandhi : पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
Nashik Crime : नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
Rahul Gandhi : राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
नवी इमारत दीड वर्षांपासून धुळखात पडून; सातारा पोलिसांचा संसार जुन्याच वसाहतीत, पोलीस पत्नींची भावनिक साद
नवी इमारत दीड वर्षांपासून धुळखात पडून; सातारा पोलिसांचा संसार जुन्याच वसाहतीत, पोलीस पत्नींची भावनिक साद
Delhi Vidhansabha Results : दिल्लीतील एक्झिट पोलनंतर भाजपवर निशाणा; 'आप'ने पहिल्यांदाच सांगितला विधानसभा निकालाचा आकडा
दिल्लीतील एक्झिट पोलनंतर भाजपवर निशाणा; 'आप'ने पहिल्यांदाच सांगितला विधानसभा निकालाचा आकडा
Akshay Shinde Encounter : तुम्हाला यायचं तर या, नाहीतर...; अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय
तुम्हाला यायचं तर या, नाहीतर...; अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय
Ladki bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेची स्क्रूटिनी 15 दिवसांपासून सुरु, 'त्या' 5 लाख लाभार्थ्यांचा आकडा समोर
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, महिला व बाल विकास विभाागकडून स्क्रूटिनी सुरु, 5 लाखांचा आकडा समोर
Embed widget