एक्स्प्लोर

Delhi Vidhansabha Results : दिल्लीतील एक्झिट पोलनंतर भाजपवर निशाणा; 'आप'ने पहिल्यांदाच सांगितला विधानसभा निकालाचा आकडा

Delhi Vidhansabha Results : आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर भाष्य करताना, आम आदमी पार्टीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीतील 70 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. त्यामुळे, गेल्या महिनाभरापासून दिल्लीत सुरू असेलला राजकीय धुरळा शांत झाला असून सर्वांच्या नजरा दिल्ली विधानसभेच्या निकालाकडे लागल्या आहेत. दिल्लीत गेल्या 10 वर्षांपासून आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात शासनाचा कारभार करण्यात आला. मात्र, दिल्लीतील मद्यधोरण घोटाळा चांगलाच गाजला असून यावरुन विरोधी भाजपने (BJP) रान उठवलं होतं. मद्यधोरण घोटाळ्यावरुन आपचे नेते व मंत्री मनिष सिसोदिया व अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातही जावे लागले. त्यामुळे, यंदाच्या निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच, मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून भाजपचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. या एक्झिट पोलनुसार, दिल्लीतील (Delhi) विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपला 44 ते 50 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर, आम आदमी पक्षाला केवळ 15 ते 25 जागा मिळू शकतात. मात्र, आप आदमी पक्षाने एक्झिट पोलनंतर प्रथमच किती जागा मिळतील, याचे भाकीत केले आहे. 

आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर भाष्य करताना, आम आदमी पार्टीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत आपला 50 पेक्षा जास्त जागा मिळतील, असे गोपाल राय यांनी म्हटले आहे. पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर गोपाल राय यांनी माध्यमांशी संवाद साधला. ''एक्झिट पोलच्या माध्यमातून माहोल बनविण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे. एक्झिट पोलच्या आधारे ऑपरेशन लोटसद्वारे निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र, आमचे सर्वच उमेदवार मतमोजणीच्या तयारीला लागले आहेत. दिल्लीत आम्हीच सरकार बनवू, भाजपला खरा चेहरा उद्या सर्वांसमोर असेल'',  गोपाल राय यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. 

एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालासंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार, दिल्लीत सत्तांतर होणार असून भाजपला 45 ते 55 जागा मिळतील, असा अंदाज आहे. एक्सिस माय इंडियाच्या सर्वेनुसार भाजपला 45 ते 55 जागा, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 15 ते 25 जागा मिळू शकतात. या एक्झिट पोलनुसार दिल्लीत काँग्रेसला एकही जागा जिंकता येणार नाही. त्यामुळे, दिल्लीत यंदा सत्तांत होईल असा दावा एक्झिट पोलने केला आहे. सीएनएक्सच्या सर्वेनुसार, आपला 10 ते 19 जागा जिंकता येतील, भाजपला 49 ते 61 जागांवर विजय मिळू शकतो. इतरमध्ये 0 ते 1 जागा असा अंदाज आहे. तर, डीवी रिसर्चनुसार, आप 26 से 34, भाजपा 36 से 44 जागा जिंकेल असा अंदाज आहे. 

भाजपकडूनही 50 जागा जिंकण्याचा दावा

दरम्यान, आप आदमी पक्षाने इथे तिसऱ्यांदा सरकार आम्हीच बनवू, असा दावा केला आहे. तसेच, 50 पेक्षा जास्त जागा जिंकू, असेही भाकीत केले आहे. तर, भाजपनेही आपण 50 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा केला आहे. मात्र, गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकीत दिल्लीत भाजपला दुहेरी आकडाही पार करत आला नाही. 2020 मध्ये भाजपने 8 तर, 2015 मध्ये केवळ 3 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, दिल्ली विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षाला 36 जागांवर विजय मिळवणे अपेक्षित आहे. त्यामुळे, आता सर्वांच्या नजरा 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. 

हेही वाचा

मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
LPG Gas Shortage Maharashtra: गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Embed widget