एक्स्प्लोर

Akshay Shinde Encounter : तुम्हाला यायचं तर या, नाहीतर...; अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली.

Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार (Badlapur School Case) प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला होता. सध्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी पार पडत आहे. काल गुरुवारी (दि. 06) झालेल्या सुनावणीवेळी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी आम्हाला केस लढवायचे नाही, अशी खळबळजनक भूमिका घेतली होती. यावर आज शुक्रवारी (दि. 07) मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून सुनावणी सुरूच राहणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट होता आणि त्या प्रकरणात दोषी असणाऱ्या पाच पोलिसांवर काय कारवाई केली? या प्रकरणावर गुरुवारी दिवसभर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, गुरुवारी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडे हात जोडून विनंती केली होती. अक्षय शिंदेचे बनावट एन्काऊंटरचे प्रकरण आता यापुढे आम्हाला न्यायालयात लढवायचे नाही, असे त्यांनी कोर्टाला सांगितले होते. अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी आम्हाला ही धावपळ आम्हाला जमत नाही. आमच्या सुनेला नुकतेच मूल जन्माला आलेले आहे. आम्हाला आता त्याच्याकडे जायचे आहे. त्यामुळे ही दररोजची धावपळ आणि प्रवास आम्हाला जमत नाही. असे कोर्टाला सांगितले होते. 

सुनावणी सुरूच राहणार

आता यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तुम्हाला यायचं असेल तर या. नाहीतर यायची गरज नाही. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, मात्र सुनावणी सुरूच राहणार आहे. आम्ही तुम्हाला बोलावलं नव्हतं, असे म्हणत न्यायालयाने अक्षय शिंदेच्या आई वडिलांना समजावलं आहे. त्यामुळे आता  अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी सुरूच राहणार आहे. 24 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

आम्ही लढा सुरूच ठेवणार : अमित कटारनवरे

दरम्यान, यावर अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी प्रतिक्रिया दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती. मात्र त्याची काही कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत. म्हणून आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. 24 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. अक्षयच्या आई वडिलांनी जरी याचिका मागे घतली असली तरी आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत, असे वकील अमित कटारनवरे यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा

Akshay Shinde Encounter: मोठी बातमी : बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Elections: होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
Mahima Chaudhary Sanjay Mishra Viral Video: 52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? पॅपाराझींसमोर नवविवाहित जोडप्याप्रमाणे दिल्या पोज
52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? व्हायरल VIDEO मुळे चाहते हैराण
राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा पार विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली
लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा पार विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Row: मतदार यादीत बोगस आणि दुबार नावं, MVA चा आरोप; SEC ने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश
Sugarcane Protest: ऊस दरावरून कोल्हापुरात संघर्ष पेटला, शेतकरी आक्रमक
Farmers Protest: 'सरकार सकारात्मक आहे', Bacchu Kadu यांच्या आंदोलनावर गृहराज्यमंत्री Pankaj Bhoyar यांची माहिती
Maharashtra Politics: बच्चू कडूंच्या आंदोलनाला आता मनोज जरांगेंची एन्ट्री, नागपूरकडे रवाना
Nagpur Protest: 'न्यायालयाचा सन्मान करू', कोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू नरमले, महामार्गावरील आंदोलन मागे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Elections: होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
Mahima Chaudhary Sanjay Mishra Viral Video: 52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? पॅपाराझींसमोर नवविवाहित जोडप्याप्रमाणे दिल्या पोज
52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? व्हायरल VIDEO मुळे चाहते हैराण
राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा पार विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली
लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा पार विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली
Ranjitsingh Naik Nimbalkar: डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुषमा अंधारेंनी आरोपांची राळ उडवली, रणजितसिंह निंबाळकरांचा समर्थकांना आदेश, म्हणाले....
डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुषमा अंधारेंनी आरोपांची राळ उडवली, रणजितसिंह निंबाळकरांचा समर्थकांना आदेश, म्हणाले....
Sooraj Pancholi Quits Bollywood: भाईजाननं लॉन्च केलेल्या हँडसम हंकचा बॉलिवूडला कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचा नाव न घेता कपूर कुटुंबीयांवर गंभीर आरोप
बॉलिवूडला 'या' हँडसम हंकचा कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचे दिग्गज अभिनेत्यावर गंभीर आरोप
Dharashiv Politics: भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी
भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी
TV Actress Nupur Alankar Left Showbiz: टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट
टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट
Embed widget