Nirbhaya Yojana : महिलांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या गाड्या 3 महिन्यांपासून धूळ खात
Nirbhaya Fund Yojana : देशातील कोणत्याही मुलीला निर्भयासारखा त्रास होऊ नये म्हणून निर्भया योजना/निधी सुरू करण्यात आला.
Nirbhaya Fund Yojana : केंद्र सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक योजना राबवते. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार त्या योजना प्रत्यक्षात समाजातील तळागाळात राबविण्याचे काम करते. दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने निर्भया योजना सुरू केली होती. देशातील कोणत्याही मुलीला निर्भयासारखा त्रास होऊ नये म्हणून निर्भया योजना/निधी सुरू करण्यात आला. निर्भया फंड ही केंद्र सरकारने जाहीर केलेली रक्कम आहे. महिलांवरील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी देशभरातील पोलीस दलांना संसाधने उपलब्ध करून दिली जातात. नुकत्याच निर्भया फंडाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून मुंबई पोलिसांना शेकडो चारचाकी आणि दुचाकी वाहने देण्यात आली. ज्याची एकूण किंमत सुमारे 30 कोटी आहे. यामध्ये 220 SUV, 35 MUV आणि सुमारे 350 दुचाकींचा समावेश आहे. ही सर्व वाहने मार्च महिन्यात मुंबई पोलिसांना देण्यात आली होती.
मुंबईतील भोईवाडा स्टेशन अंतर्गत नायगाव पोलीस ग्राऊंडच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगेत गाड्या उभ्या आहेत. या गाड्या गेल्या तीन महिन्यांपासून अशाच पडून आहेत. त्यांचा वापरच केला जात नाही. राज्य सरकारच्या पोलिसांना महिलांच्या बचावासाठी वापरता याव्यात म्हणून केंद्र सरकारने ही वाहने येथे आणली आहेत. परंतु, निर्भयाचे प्रकरण डोळ्यांसमोर असतानाही हा प्रकार घडतोय. निर्भया योजनेच्या निधीतूनच ही वाहने खरेदी करण्यात आली होती. जेणेकरून विविध राज्यांतील शहरांमध्ये पेट्रोलिंगची सुविधा वाढवावी. तसेच, शहरातील महिलांना या काळात सुरक्षित वाटू शकेल. मात्र, 3 महिने उलटूनही ही वाहने ज्या कामासाठी आणली होती ते काम पूर्ण होताना दिसत नाही.
या प्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता, त्यांच्या वतीने सांगण्यात आले की, "या प्रश्नाचे उत्तर मुंबईचे पोलिस आयुक्तच देऊ शकतात. तर, या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना विचारले असता, त्यांनी या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही."
महत्वाच्या बातम्या :
- Konkan Railway : कोकण रेल्वे सुस्साट धावणार, 100 टक्के विद्युतीकरण; PM मोदींच्या हस्ते आज लोकार्पण
- Coronavirus : दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मृत्यूंची संख्या मात्र वाढली
- Mumbai News : मुंबई पोलीस दलातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह अखेर सापडला, पोलिसांकडून तपास सुरू