Mumbai News : मुंबई पोलीस दलातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह अखेर सापडला, पोलिसांकडून तपास सुरू
Mumbai News : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा शोध अखेर लागला आहे.
Mumbai News : मुंबई पोलिस दलातील निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह अखेर सापडला आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा शोध अखेर लागला आहे. शिवदास भोजराज कुमावत (वय 87), असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करत आहे.
कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरु
शिवदास भोजराज कुमावत मुलुंड पूर्वे येतील म्हाडा कॉलनी, साईराम सोसायटीत कुटुंबियांसोबत राहायचे. कुमावत ते पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यांचा मुलगाही पोलीस दलात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे 15 जून रोजी संध्याकाळी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. शोध न लागल्याने कुटुंबीयांनी नवघर पोलीस ठाणे धाव घेतली. "त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याप्रकरणी नोंद करत तपास सुरु केला. कुमावत यांचा शोध सुरु असताना रविवारी म्हाडा कॉलनी येथील नाल्यात त्यांचा मृतदेह मिळून आल्याने कुटुंबियांना धक्का बसला," अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानी याबाबत माहिती दिली.
पोलिसांकडून तपास सुरू
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांसह कुटुंबीयांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, 15 तारखेला रात्री साडे आठच्या सुमारास कुमावत हे येथील महालक्ष्मी सोसायटीच्या दिशेने मागे जाताना दिसून आले. याबाबत नवघर पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. कुटुंबानी पोलिसांना दिलेल्या माहिती प्रमाणे कुमावत यांना स्मृतीभ्रंशचा आजार असल्यामुळे ते वाट चुकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यातून ते नाल्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
Konkan Railway : कोकण रेल्वे सुस्साट धावणार, 100 टक्के विद्युतीकरण; PM मोदींच्या हस्ते आज लोकार्पण
Coronavirus : दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मृत्यूंची संख्या मात्र वाढली
PM Modi Agneepath : अग्निपथ योजनेवर देशभरात वाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...