Lalbaugcha Raja : ही समुद्राची लाट देवा, पाहते तुमची वाट...लालबागचा राजा तराफ्यावरुन समुद्रात उतरला, विसर्जन संपन्न
Lalbaugcha Raja Visarjan : ढोलताशांचा दणादणाट... फटाक्यांची आतषबाजी...गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक तब्बल 23 तास सुरू होती.
मुंबई : ही शान कोणाची लालबागच्या राजाची, लालबागच्या राजाचा विजय असो.....अशा जयघोषात अतिशय भावपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja Visarjan 2024) विसर्जन करण्यात आले आहे. मुंबईची (Mumbai) शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती. यानंतर समुद्रात 'लालबागच्या राजा' चे शाही विसर्जन करण्यात आले असून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...'च्या गजरात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
लालबागचा राजा सकाळी 6 च्या सुमारास गिरगावच्या चौपाटीवर दाखल झाला. गिरगाव चौपाटी परिसरात पहाटे पाचच्या सुमाराला मुसळधार पाऊस झाला आणि भर पावसातही विसर्जन सुरू होते. गिरगाव चौपाटी परिसरात चिंचपोकळीचा चिंतामणी आणि माजगावचा राजा सोबत लालबागचा राजाची मिरवणूकही भर पावसात सुरूच होती. लालबागचा राजाच्या दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची रात्र पासून गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुंबईतील (mumbai) लालबागमध्ये काल, मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरूवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. यावेळी ढोलताशांचा दणादणाट... फटाक्यांची आतषबाजी...गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक तब्बल 23 तास सुरू होती.
लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात शाही थाटात विसर्जन
हायड्रॉलिक्सचा वापर यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja ) खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. 22 तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झालेला पाहायला मिळाला नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती. तब्बल 23 तासांच्या उत्साहपूर्ण, जल्लोषात आणि ढोलताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात शाही थाटात विसर्जन करण्यात आले.
राज्यात चोख पोलीस बंदोबस्त
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनीही कंबर कसली होती. मोठ्या उत्साहात, थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. त्यासाठी किनारपट्टीवरही पोलिसांनी यंत्रणा उभी केली आहे.
Lalbaugcha Raja Visarajan 2024 Video : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
हे ही वाचा :