एक्स्प्लोर

नारायण राणेंची शरद पवारांना थेट धमकी; संजय राऊतांचं ट्वीट, म्हणाले...

Shivsena MP Sanjay Raut Tweet on Narayan Rane : नारायण राणेंच्या धमकीनंतर संजय राऊत यांचा पीएमओला सवाल. नारायण राणेंच्या धमकीनंतर संजय राऊत यांचा सवाल

Shivsena MP Sanjay Raut Tweet on Narayan Rane : बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण  राणे (Narayan Rane) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना दिली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. आता राणेंच्या याच धमकीचा समाचार शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत नारायण राणे यांना थेट सवाल विचारला आहे. शरद पवारांना राणेंनी दिलेली धमकी भाजपची भूमिका आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, "महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल... पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही." 

काय म्हणाले होते नारायण राणे? 

राज्यातील सत्तापेचानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल, असं स्पष्ट केलं. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये राणे म्हणाले की, "माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल."

शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले? 

शरद पवार म्हणाले होते की, "बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावंच लागेल."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत - प्रकाश आंबेडकरLok Sabha Seat Sharing Conflicts : प्रत्येक पक्षात एकच आवाज, मै भी नाराज! युती-आघाडीत नाराजीचं पेवTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  06 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
SSC Exam 2024 : हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Embed widget