Ratnagiri: धक्कादायक! कुटुंबावर 20 जणांच्या टोळक्याचा हल्ला
Ratnagiri Crime news: परप्रांतिय या ठिकाणी राहू शकत नाही, असं म्हणत 20 जणांच्या टोळक्यानं एका कुटुंबावर हल्ला केल्याची धक्कादायक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील देगाव येथे घडली आहे.
Ratnagiri Crime News: परप्रांतिय या ठिकाणी राहू शकत नाही, असं म्हणत 20 जणांच्या टोळक्यानं एका कुटुंबावर हल्ला केल्याची धक्कादायक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील देगाव येथे घडली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता जवळपास 20 जणांचं टोळक्यानं हा हल्ला अचानकपणे केला. या घटनेबाबत दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून 20 अज्ञातांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे.
या हल्ल्यात घराचं पूर्णत: नुकसान झालं आहे. जवळपास 4 लाखांची रोकड यावेळी गायब झाल्याचा दावा देखील गंगासागर शुक्ला यांनी केला आहे. यावेळी घरातील कपडे, गृहोपयोगी सामान, अन्नधान्याचं देखील नुकसान झालं आहे. मी परप्रांतिय असल्यानं संपूर्ण गावानं हल्ला केल्याचा गंभीर आरोप शुक्ला यांनी 'एबीपी माझा'कडे बोलताना केला आहे. दरम्यान, या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
कशी घडली घटना?
मुळचे उत्तर प्रदेशचे असलेले गंगासागर शुक्ला यांनी देगावपासून जवळचं असलेल्या सीतेचा माळ इथं वर्षभरापूर्वी 14 गुंठे जागा विकत घेतली आहे. ते काजूचा व्यवसाय करतात आणि आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. विकत घेतलेल्या जागेवर घर बांधण्याचा त्यांचा मानस होता. त्याप्रकारची तयारी देखील त्यांनी केली होती. पण शनिवारी दुपारी अचानकपणे मोठ्या संख्येनं लोकांनी माझ्या घरावर हल्ला केला. 'तू परप्रांतिय आहेस. तुला इथं राहता येणार नाही', अशा प्रकारची धमकी देत शिवीगाळ देखील केल्याचा आरोप गंगासागर शुक्ला यांचा आहे. माझा संसार पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. माझ्या घरातील जवळपास 4 लाखांची रोकड गायब असून 400 किली काजू बी देखील यामध्ये उद्धवस्त झाल्याचा आरोप शुक्ला यांना एबीपी माझाकडे बोलताना केला आहे.
सध्या घरात कपडे, गृहोपयोगी सामान शिल्ल्क नाही. ज्यावेळी हल्ला झाल्या त्यावेळी मी आणि माझ्या पत्नीनं घटनास्थळावर पळ काढला म्हणून वाचलो. हल्लेखोर आम्हाला शोधत होते. पण, आम्ही सापडलो नाही. मुलगी शाळेत होती. अचानकपणे मोठ्या संख्येनं दुपारच्या वेळी टोळक्यानं हल्ला केला असा घटनाक्रम गंगासागर शुक्ला यांनी सांगितला. मला सतत धमक्या येत असून माझ्या जीवाला धोका आहे, असं देखील शुक्ला यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आता किमान आम्हाला न्याय हवा अशी मागणी शुक्ला यांनी केली आहे.