एक्स्प्लोर

Pune water Supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' दिवशी संपूर्ण पुण्याचा पाणीपुरवठा बंद असणार

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी (Water) आहे. ऐन उन्हाळ्यात गुरुवारी (27 एप्रिल) संपूर्ण पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Pune water Supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. ऐन उन्हाळ्यात गुरुवारी (27 एप्रिल) संपूर्ण पुण्यात पाणीपुरवठा (Pune Water Cut) बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर (Pune News) पुन्हा पाणी जपून वापरण्याची वेळ (Water Supply)  आली आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) 27 एप्रिलला पर्वती, छावणी, नवीन आणि जुने होळकर, भामा-आसखेड, वारजे, SNDT, चतुशृंगी, वडगाव आणि कोंढवे-धावडे यासह अनेक जलशुद्धीकरण केंद्रांवर दुरुस्तीचं काम करणार आहे. त्यामुळे त्या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे. येत्या (शुक्रवार) 28 एप्रिलपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल.

या भागात पाणी पुरवठा बंद (Water Cut) असणार...

शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व पेठ परिसर, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर 1 आणि 2, लेक टाऊन एरिया, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गाव, डायस प्लॉट, ढोले माला एरिया, सॅलिसबरी भवन, गव्हाण पार्क, गव्हाणनगर परिसर , मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पार्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गणेजेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, पुणे केनवडी परिसर, कॅनव्हाणगाव परिसर, साडेसातरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी , खराडी , वडगाव शेरी , ताडीवाला रोड , मंगळवार पेठ , मालधक्का , येरवडा , रेसकोर्स, मुळा रोड, खडकी, हरिगंगा सोसायटी, लोहेगाव, विमाननगर, कल्याणनगर, कल्याणनगर, फुगेवाडी, कळस, धानोरी, पाषाण, भुगाव रोड, बावधन, उजवीकडे व डावीकडे भुसारी कॉलनी, गुरुगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लाडकी, लांडगे. सुस रोड, रेणुकानगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, धनंजय सोसायटी, कोथरुड प्रादेशिक कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, कर्वेनगर, ता., रामनगर, कॅनॉल रोड, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रोड, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध या परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget