ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजितदादांची भूमिका...दोषी असलेल्यांना फाशीच्या शिक्षा होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास...
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर जनहित याचिका दाखल करू, अंजली दमानियांचा इशारा...तर राजीनाम्यावर फडणवीस आणि अजित पवारच उत्तर देतील, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण...
बाप बसलाय, पोलीस उपरिनीक्षक निशिगंधा खुळेंसी संभाषण करताना वाल्मिक कराडची फुुशारकी, ऑडिओ क्लिप व्हायरल...तर वाल्मिक कराड बीडचा सुपर पालकमंत्री सुरेश धस यांचा हल्लाबोल...
फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडणं मुश्कील, संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंकडे बोट दाखवत आरोप...तर क्षीरसागर यांचेच आंधळेंशी संबंध असतील, धनंजय मुंडेंचा पलटवार...
बाबा सिद्दीकी यांची हत्या एसआरए प्रकल्पामुळेच, पोलिसांच्या जबाबात झिशान सिद्दीकींचं सूतोवाच...सात बिल्डरांचाही उल्लेख...पोलिसांनी मात्र एसआरए वादाचा अँगल फेटाळला...
एसआरएसाठी अनिल परबांनीे रहिवाशांची बैठक घेतली, झिशान सिद्दीकींचा जबाबात उल्लेख...हत्येच्या दिवशी मोहित कंबोज यांच्याशी बाबा सिद्दीकींची बातचीत झाल्याचाही दावा...दोघांनीही आरोप फेटाळले...
महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, इंदापूर, दौंड, बारामतीतील शिवसैनिकांची सुप्रिया सुळेंवर नाराजी, सुषमा अंधारेंनी फोडली वाचा, तर नाराजी दूर करणार, सुप्रिया सुळेंचं एबीपी माझावर आश्वासन...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर...पालिका निवडणुकीसंदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली...पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला...