एक्स्प्लोर

सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार

मुंबईतील या संघटनेने इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेन्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीए) विमा नियामक प्राधिकरण यांना पत्र लिहून मागणी केली आहे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Sai ali khan) मुंबईतील लीलावती रुग्णालयात 4 दिवस उपचार करण्यात आले. चोरट्याने मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने घरात घुसून सैफवर चाकुने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सैफला तत्काळ मुंबईतील (Mumbai) लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 4 दिवसांच्या उपाचाराचा खर्च तब्बल 36 लाखांपर्यंत गेल्याचं माहितीतून समोर आलं आहे. विशेष म्हणजे सैफला 25 लाख रुपयांचा कॅशलेस मेडिक्लेमही मंजुर झाला. मात्र, मुंबई असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सने अभिनेता सैफ अली खान यांना विमा पॉलिसीतून 25 लाख रुपयांचे कॅशलेस मंजुरी मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य पॉलिसीधारकांना मिळणाऱ्या सुविधांपेक्षा ही मंजुरी अधिक असल्याने असोसिएशनने याला अन्यायकारक म्हटले आहे. त्यामुळे, सैफसाठी मेडिक्लेम कंपन्यांचा वेगळा न्याय का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

मुंबईतील या संघटनेने इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेन्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीए) विमा नियामक प्राधिकरण यांना पत्र लिहून मागणी केली आहे. या लिहिलेल्या पत्रात कॅशलेस क्लेम, सेलिब्रिटीज यांना देण्यात येणारी विशेष वागणूक, तसेच सर्वसामान्य नागरिक आणि लहान नर्सिंग होम यांना इन्शुरन्स क्लेम देताना केली जाणारी वागणूक, यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संघटनेचे 14 हजार सदस्य आहेत. या संघटनेच्या मते, सेलिब्रिटी आणि उच्च-प्रोफाइल व्यक्तींना मिळणारे प्राधान्य हे सामान्य पॉलिसीधारकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणि समानता असायला हवी, अशी मागणी त्यांनी IRDA कडे केली आहे. तसेच, लहान नर्सिंग होम्स आणि रुग्णालयांना विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या देय दरांमध्ये मोठ्या रुग्णालयांच्या तुलनेत तफावत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ही तफावत दूर करून, सर्वांना एकसमान आणि न्याय्य आरोग्यसेवा मिळावी, अशी मागणी देखील संघटनेकडन करण्यात आली आहे. तसेच, IRDA ने यावर तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आम्ही कोणत्या हॉस्पिटलला किंवा कोणत्या व्यक्तीचा किती विमा दावा मान्य केला याविरोधात नाही, तर सर्वसामान्य विमानधारकांना आणि नर्सिंग होमला समान न्याय दिला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. केवळ नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहे, म्हणून कॅशलेस क्लेम नाकारायचा हे धोरण चुकीचे आहे. कोणत्याही विमाधारकाला आणि कॉर्पोरेट रुग्णालयाला विशेष वागणूक देऊ नये, असे संघटनेचे मत असल्याचे चेअरमन, मेडिको लीगल असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटडॉ.सुधीर नाईक यांनी म्हटलं आहे. 

सैफसाठी 4 दिवसांत 36 लाखांचं बिल? 

चोरट्याच्या हल्ल्यानंतर लीलावती रुग्णालयात उपचार घेतलेल्या अभिनेता सैफ अली खानवर झालेले संपूर्ण उपचार कॅशलेस इन्शोरन्सवर करण्यात आले. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करताच इन्शोरन्स कंपनीनं तात्काळ 25 लाख रुपये मंजूर केले. पण, 4 दिवसांनी ज्यावेळी सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी त्याचं बिल 36 लाख रुपये होतं. आता विमा कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, त्यांनी इतक्या लवकर 25 लाख रुपये कसे काय मंजूर केले?, असा सवाल उपस्थित होत असून सेलिब्रिटीसाठी वेगळा न्याय लावण्यात आल्याची चर्चा मेडिकल कन्सल्टंटमध्ये आहे.  

हेही वाचा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss : 'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
Shreya Ghoshal: 'कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिट...'; श्रेया घोषालकडून म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल, खुलासा करत म्हणाली...
'कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिट...'; श्रेया घोषालकडून म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल, खुलासा करत म्हणाली...

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget