एक्स्प्लोर
रोजगार हमी योजनेचा पैसा आता थेट लाभार्थीच्या बँक खात्यात

मुंबई : वैयक्तिक लाभांच्या योजनांचा निधी आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या माहितीमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सिंचन, विहीर, शेततळे अशा विविध योजना रोजगार हमी योजना विभागातर्फे राबवल्या जातात. याआधी अशा योजनांसाठी ग्रामपंचायतींमार्फत साहित्य खरेदी करुन लाभार्थ्यांना पुरवलं जात होतं. मात्र आता लाभार्थ्याला साहित्य खरेदी केल्याचं बिल ग्रामसेवकाला सादर करावं लागणार आहे.
बिल सादर केल्यानंतर सात दिवसांच्या आत साहित्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. मजुरांची मागणी आणि कामाचा विलंब टाळण्यासाठी ई-मस्टर आता तालुका स्तराऐवजी ग्रामपंचायत स्तरावरुनच काढण्याचा निर्णय रोहयो विभागाने घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
मुंबई
करमणूक
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
