Datta Gade Wife : वकिलानंतर आता दत्ता गाडेच्या बायकोचाही मोठा दावा; म्हणाली, 'बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली, मग...'
Datta Gade Wife : आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद करत असताना हा बलात्कार नसून दोघांच्या समंतीने संबंध निर्माण झाले असा धक्कादायक दावा केला आहे, अशातच दत्ता गाडेच्या बायकोने देखील पतीची पाठराखण करत मोठं वक्तव्य केलं आहे.

पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी (दि. 25) सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान नराधम दत्तात्रय गाडे याने एका 26 वर्षीय पीडितेवर कंडक्टर असल्याचं भासवत बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. शुक्रवारी पहाटे आरोपीला त्याच्या मुळ गावातून अटक करण्यात आली. या नराधम आरोपीला पकडण्यासाठी जवळपास पाचशे पोलिसांचा फौजफाटा, इतर वेगवेगळ्या टीम, ड्रोन कॅमेरे, डॉग स्क्वॉड त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील गुनाट गावचे ग्रामस्थ हे सर्वजण प्रयत्न करत होते, अशातच त्याला तब्बल 72 तासांनी पकडण्यात यश आलं आहे. त्याला पकडल्यानंतर न्यायलयात हजर करण्यात आलं. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद करत असताना हा बलात्कार नसून दोघांच्या समंतीने संबंध निर्माण झाले असा धक्कादायक दावा केला आहे, यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अशातच दत्ता गाडेच्या बायकोने देखील पतीची पाठराखण करत मोठं वक्तव्य केलं आहे.
दत्ता गाडेची बायको नेमकं काय म्हणाली?
स्वारगेट अत्याचार प्रकरणाबाबत बोलताना दत्तात्रय गाडेची पत्नी म्हणाली, मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतेय की, माझ्या नवऱ्याने बलात्कार केला आहे. बलात्कार केला तर मग तिचे कपडे कुठे फाटले आहेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसत आहे का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने उपस्थित केला आहे. त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले असल्याचा मोठा दावा दत्ता गाडेच्या पत्नीने केला आहे. तिच्यावर बलात्कार होत होता तर त्या तरुणीने आरडाओरड का केली नाही? असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरु आहे. या प्रकरणात आणखी कोणत्या महत्त्वाच्या बाबी समोर येतात ते ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी होणार
आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी होणार असल्याची माहिती आहे. आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. आरोपीविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. बसची फॉरेन्सिक चाचमी त्यात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली ती पण पॉझिटिव्ह आली आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणातील आरोपी नराधम हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर हा गुन्हा केल्यानंतर नराधम आरोपीने दोन ते तीन वेळा आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवशाही बस ही रात्रभर स्वारगेट बस स्थानकात होती. पीडितेने याबाबत सकाळी 9.30 च्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर सरकारी बसमध्ये पहाटे 5.30 च्या सुमारास एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना स्वारगेट येथील बस स्थानकात घडली. शिवशाही बस ही रात्रभर स्वारगेट बस स्थानकात होती. पीडितेने याबाबत सकाळी 9.30 च्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
सविस्तर घटनाक्रम असा
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना शुक्रवारी पहाटे यश आले आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर.
1. मंगळवारी (दि. 25) पहाटे सहाच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये घडली अत्याचाराची घटना घडली.
2. मंगळवारी सकाळी 09.30 च्या सुमारास पीडिता स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाली, तोवर आरोपी बसने आपल्या गावी गेला.
3. सकाळी 10 च्या सुमारास स्वारगेट पोलिसांनी बस स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेज तपासून दत्तात्रय गाडे हा आरोपी असल्याचे निष्पन्न केले. (पीडितेने देखील हाच आरोपी असल्याचे पोलिसांना सांगितले, तपास सुरू झाला होता.)
4. सकाळी 10 वाजता आरोपी दत्तात्रय गाडे त्याच्या गुनाट गावातील काल्याच्या कीर्तनात सहभागी झाला होता.
5. पोलिसांनी गुन्ह्याच्या वेळी आरोपीचे लोकेशन तपासले असता ते स्वारगेट बस स्थानकात आढळून आले.
6. सकाळी 11 वाजता स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक गुनाट गावाकडे रवाना झाले.
7. दुपारी अडीचच्या सुमारास पोलिस गुनाट गावात दाखल झाले.
8. दुपारी 4 वाजता आरोपी पकडल्याची माहिती मिळाली. मात्र, तो दत्तात्रयचा भाऊ असल्याचे निष्पन्न झाले. दत्ता गाडे आणि त्याचा भाऊ दिसायला एकसारखे दिसतात.
9. आरोपी दत्तात्रय घराकडे येत असताना त्याने पोलिसांना बघितल्यावर उसाच्या शेतातपळ काढला.
10. गावकऱ्यांनी दत्तात्रयला गावाच्या परिसरातच बघितल्याचे सांगितल्याने शोधाशोध सुरू झाला होता.
11. बुधवारी (दि. 26) दुपारी 12च्या सुमारास अत्याचाराची घटना उघडकीस आली. गुन्हे शाखा, स्वारगेट पोलिस, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 18 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू झाला.
12 . पोलिसांकडून सरपंच, पोलिस पाटील, तरुण मुलांच्या बैठकांना सुरुवात झाली. यावेळी आजूबाजूच्या अन्य गावच्या लोकांना बोलावत फोटो देऊन आरोपी दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
13. आरोपी दत्तात्रय शेतात दिसल्याची गावकऱ्यांची पुष्टी केली.
14. रात्री आठच्या सुमारास आरोपी गावातील नातेवाइकाकडे पाणी पिण्यासाठी आला होता.
15. गुरुवार (दि. 27) पुणे पोलिसांनी धाराशिव येथून 2 थर्मल ड्रोन मागवले. यासह श्वान पथकासह सकाळी साडेदहापासून शोधाशोध सुरू झाला.
16 . श्वान पथकाने दत्तात्रयचा ज्या ठिकाणी वावर होता अशा 3 ठिकाणी पोलिसांना नेले सर्वात्र शोध घेतला.
17. ऊस पूर्ण वाढलेला असल्याने, तसेच 150 एकरमध्ये उसाची शेती असल्याने पाणी, दलदल यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.
18 . रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी चांदणशिव वस्तीतील बहिरट यांच्या घरी पाणी पिण्यासाठी आला. त्यांनी दार न उघडताच खिडकीतून पाणी दिले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचारी असलेल्या त्यांच्या भावाला दत्तात्रयबाबत माहिती दिली.
19. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने पुणे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गावातील 300 मुले, गुन्हे शाखेचे 70 कर्मचारी आणि स्वारगेट पोलिसांचे 20 कर्मचारी दुचाकीवरून आरोपीच्या शोधात होते.
20. मध्यरात्री1 वाजून 10 मिनिटांनी गावापासून 150 ते 200 मीटर असलेल्या माळरानात (क्रिकेटचे मैदान) चरीतून पळताना आरोपी दत्तात्रयला पकडले.
21. मध्यरात्री दीडच्या सुमारास स्वारगेट पोलिस ठाण्याचे एपीआय मोकाशी व पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपीला घेऊन स्वारगेट पोलिस लष्कर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलं.























