सलमान खानचा सिकंदर प्रदर्शनासाठी सज्ज, पहिल्याच दिवशी तगडी कमाई करण्याची शक्यता, जाणून घ्या नेमके किती कोटी कमवणार?
Salman Khan Sikandar Film Box Office Collection : सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड्स मोडण्याची शक्यता आहे.

Salman Khan Sikandar Film: आजघडीला अभिनेता सलमान खानला वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याचा चित्रपट आला की तो सुपरहिट होतोच. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी ईदच्या दिवशी सलमान खानचा नवा चित्रपट येतो. यावेळीही त्याचा सिकंदर हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट यंदा बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट नेमका किती कोटींचा गल्ला जमवणार प्राथमिक अंदाज समोर आला आहे.
सिकंदरचा टिझर रिलीज, लाखो व्ह्यूज
सलमान खान आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांचे चांगले मनोरंजन करतो. यावेळी ईदच्या दिवशी त्याचा सिकंदर हा चित्रपट येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या चित्रपटाचा 1 मिनिट 21 सेकंदांचा टिझर रिलीज झाला होता. या टिझरला तेव्हा लोकांची चांगली पसंद मिळाली होती. काही क्षणात या चित्रपटाला लाखो व्ह्यूज मिळाले. हा टिझर पाहून सलमान खान या चित्रपटात डॅशिंग अवतारात दिसेल असा अंदाज लावला जात आहे.
तज्ज्ञांनी सांगितले कमाईचे आकडे
मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या करिअरमधील सर्वांत महागड्या बजेटच्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट असेल असे म्हटले जात आहे. त्यामुळेहा चित्रपट नेमके किती रुपये कमवणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांनी तर या चित्रपटाच्या कमाईचे अंदाजही सांगितले आहेत. हा चित्रपट ओपनिंगच्या पहिल्या दिवशी दमदार कमाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पहिल्या दिवशी सिकंदर किती कोटी रुपये कमवणार?
ट्रेड अॅनालिस्ट गिरीश वानखेडे यांनी सिकंदरच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल काही अंदाज व्यक्त केले आहेत. या अंदाजानुसार सिकंदर हा चित्रपट प्रदर्शनानंतर इतिहास रचण्याची शक्यता आहे. कारण सिंकदर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अन्य मोठा चित्रपट स्पर्धेत नाही. त्यामुळे सिकंदर हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी साधारण 60 कोटी रुपये कमवण्याची शक्यता आहे. हा आकडा सत्यात उतरला तर हा चित्रपट एका आठवड्यात साधारण 200 कोटी रुपये कमवू शकतो. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान स्वत:च्याच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
हा चित्रपट येत्या 28 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सलमान खानच्या सोबतीला रश्मिका मंदाना ही अभिनेत्री दिसणार आहे. सोबतच सत्यराज शरमन जोशी, प्रतिक बब्बर आदी अभिनेतेही या चित्रपटात दिसतील.
हेही वाचा :
वय वर्षे 51, पण रुप असं की वाटते 25 वर्षांची तरुणी; मलायका अरोराचे नवे फोटो पाहिलेत का?























