Ganesh Naik: 'मी ठाण्याचा 15 वर्षे पालकमंत्री होतो, दुसरा कोणीही होणार नाही, गणेश नाईकांची शिंदेंना कोपरखळी, जनता दरबारावरून म्हणाले..
महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून इतकी बोंबाबोंब आहे. या ठाणे जिल्ह्याचा पालघर समवेत मी तीनदा पालकमंत्री होतो. असं म्हणत त्यांनी जनता दरबारावरून पुन्हा एकदा शिंदे गटावर अप्रत्यक्ष टोला लगावला.

Thane: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची मोठी चर्चा आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी बॅनरबाजी करत शक्तीप्रदर्शनही त्यांनी केले होते. दरम्यान, चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी प्रत्येक तालुक्यात मी जनता दरबार भरवणार असल्याचं सांगत मी ठाणे जिल्ह्याचा 15 वर्षे पालकमंत्री होतो. दुसरा कोणीही इतकी वर्षे पालकमंत्री होणारा नाही असं म्हणत गणेश नाईकांनी (Ganesh Naik) ठाण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) कोपरखळी मारली. भिवंडीत कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तिथे भव्य कपिल पाटील चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील मानकोली या ठिकाणी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. (Thane)
मी सलग 15 वर्षे पालकमंत्री : गणेश नाईक
यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेतला जायचा. आता तसे जनता दरबार इतर तालुक्यांमध्ये होणार का? याबाबत गणेश नाईक यांना विचारले असता पालघरमध्ये त्यानंतर नवी मुंबई व ठाणे येथे जनता दरबार पार पडले. आता पुढची तारीख मी जाहीर केली आहे. लवकरच समजेल, असे सांगत एकूण एक तालुक्यात मी जनता दरबार घेत फिरणार आहे. भिवंडी असेल शहापूर, मुरबाड,अंबरनाथ,बदलापूर कल्याण तर पालघर जिल्ह्यातील वसई,वाडा,जव्हार, मोखाडा या सर्व जिल्ह्यात या सर्व तालुक्यांमध्ये मी जनता दरबार घेणार आहे. या जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री राहिलेलो आहे पंधरा वर्षे कोणी पालकमंत्री झालेला नाही आणि भविष्यात ही होणार नाही. होईल की नाही मला शंका आहे. ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांना फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्छिलता असावी लागते आणि ती आमच्यामध्ये आहे.असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरखळी मारली.
काय म्हणाले गणेश नाईक?
या संपूर्ण मंत्रिमंडळात बिनधास्त मंत्री कोण आहे तर ते गणेश नाईक.सकाळ दुपार संध्याकाळ कधी कोणी माझ्या तोंडावर चिंता बघितली नाही.आमदार नामदार ही तात्पुरती पदं असतात. अळवावरच पाणी ..आज आहेत उद्या नाहीत. पण तुम्ही आम्ही कमावलेली माणुसकी कोणी ही हिरावून घेऊ शकत नाही.ती कोणी चोरू शकत नाही.मी मनात आणलं ते करतोच त्यासाठी मी हट्टी आहे, हे सर्वांना माहीत आहे.जे मनात आणतो ते करून दाखवतो हा अहंकार नाही ही विनम्रता आहे. कपिल पाटील यांना जिल्हा परिषद सभापती अध्यक्ष बनवताना अनेक मोठ्या मोठ्यांनी विरोध केला त्यांना ठणकावून सांगितले.. तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू. आता त्याची नाव घेतली तर तुम्ही म्हणाल आग लावली. आगीला आम्ही घाबरत नाही.पालकमंत्री पदासाठी फार वाद विवाद होतात. महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून इतकी बोंबाबोंब आहे. या ठाणे जिल्ह्याचा पालघर समवेत मी तीनदा पालकमंत्री होतो. त्या पालकमंत्री पदाच मंत्री पदाचे कौतुक मला नाही.कधी कधी लोक म्हणतात, नाम का ही है,आमदारकी खासदारकी असो नसो ज्याचे हात स्वच्छ आहेत ते कोणत्याही लढाईत जिंकू शकतात.
हेही वाचा:























