Nashik Prajakta Mali Mahashivratra Program: त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
Nashik Prajakta Mali Mahashivratra Program: त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप व्यक्त केला जात आहे. असं पत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानला पुरातत्व विभागाकडून देण्यात आलं आहे.

Nashik Prajakta Mali Mahashivratra Program: महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratra 2025) देशभरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. अशातच नाशकातील (Nashik News) त्रंबकेश्वरमधील (Trimbakeshwar) कार्यक्रमावरुन मात्र वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्रंबकेश्वराच्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या प्रांगणात मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा प्राजक्ता माळी हिच्या 'शिवस्तुती नृत्याविष्कार' (Shivstuti Nrutyavishkar) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मात्र, त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Jyotirlinga Temple) होणारा प्राजक्ता माळी यांचा कार्यक्रम अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप व्यक्त केला जात आहे. असं पत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानला पुरातत्व विभागाकडून देण्यात आलं आहे.
देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्री निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी केलं जातं. अशातच यंदा महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम देवस्थान ट्रस्टनं आयोजित केला आहे. पण, या कार्यक्रमावर आधीच माजी विश्वस्तांनी नारीज व्यक्त केलीय. अशातच, आता पुरातत्व विभागानं आक्षेप व्यक्त केल्यामुळे एकंदरीतच कार्यक्रम रद्द होणार की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पुरातत्व विभागाचा आक्षेप व्यक्त करत पुरातत्व विभागानं त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र लिहिलं आहे. महाशिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळ, अवशेष अधिनियम 1958 या कायद्यानुसार पुरातत्व विभागाकडून आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमापूर्वी दिल्लीच्या कार्यालयातून परवानगी घेण्याचे आदेश पुरातत्व विभागानं दिले आहेत.
मंदीर समितीच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनीही प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, व्हीआयपी दर्शनसाठी उत्तरेकडील गेटवर 200 रुपये शुल्क घेतल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. अशा प्रकारे प्रवेश शुल्क घेणे एएमएएसआर कायद्याचे उल्लंघन आहे, अशातच देवस्थान ट्रस्टनं तातडीनं सुधारात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पुरातत्व विभागाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत.
माजी विश्वस्तांचा प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला आक्षेप का?
महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम देवस्थान ट्रस्टनं आयोजित केलाय. पण, या कार्यक्रमावर माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, चुकीचा पायंडा पाडू नये, मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा, अशी मागणी करणारं पत्र माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना लिहिलं आहे. तसेच, मंदीर प्रशासनानं या कार्यक्रमाबाबत पुर्नविचार करावा, असंही माजी विश्वस्तांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : प्राजक्ता माळीचा कार्यक्रम अडचणीत? त्र्यंबकेश्वर देवस्थानला पुरातत्व विभागाकडून पत्र
महत्त्वाच्या इतर बातम्या :























