एक्स्प्लोर

Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत

Indrajeet Sawant & Devendra Fadnavis: अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे, माझे नातेवाईक, सहकारी सक्षम आहेत फोनवरील व्यक्तीने मला घरात घुसून मारण्याची धमकी दिली.

कोल्हापूर: छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी कसा बदलू शकतो. त्यांचा खोटा आणि घाणेरडा इतिहास मी सांगावा, अशी काहीजणांची इच्छा आहे. पण मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही. उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन, असा निर्धार इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांनी व्यक्त केला. इंद्रजित सावंत यांना फोनवरुन एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.

मला साधारण रात्री 12 वाजता धमकीचा फोन आला. फोनवरील व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत वाटते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी एका विशिष्ट समाजाचा आहे असा कधी उल्लेख केला नाही. फोनवरील व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून यावर कारवाई करण्यात यावी. मला धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील. संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर उठबस आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले.

अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे, माझे नातेवाईक, सहकारी सक्षम आहेत फोनवरील व्यक्तीने मला घरात घुसून मारण्याची धमकी दिली. मात्र, मराठ्यांचा इतिहास काय आहे ते त्यांना माहिती आहे. मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही, उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले.

मी इंद्रजित सावंतांना फोन केला नाही, प्रशांत कोरटकरांचं स्पष्टीकरण

इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत नाही, त्यांना कधीच फोनवर संपर्क ही साधलेला नाही, त्यामुळे इंद्रजीत सावंत यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केली आहे. त्या कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजही माझा नाही, असा दावाही प्रशांत कोरटकर यांनी केला आहे.

इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझा नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. किंबहुना त्यांना आलेला कॉल मीच केला आहे की नाही याची शहानिशा करायला हवी होती. त्यांनी असं काहीही न करता फेसबुक पोस्ट करून माझी बदनामी तर केलीच आहे. सोबतच मला सकाळपासून अनेक धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करेल असंही कोरटकर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य आहेत, त्यांच्याबद्दल चुकीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी इतिहासाचा विद्यार्थी असलो तरी इतिहास विषयाचा तज्ञ नसल्यामुळे इंद्रजीत सावंत सारख्या इतिहास तज्ञाला फोन करून वाद घालण्याचा प्रश्नही उद्भवत नसल्याचे कोरटकर म्हणाले. 'एबीपी माझा'ने प्रशांत कोरडकर यांना इंग्रजीत सावंत यांची फेसबुक पोस्ट दाखवत त्यातील कॉल रेकॉर्डिंग ऐकवली ती ऐकल्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी हा आवाज माझा नाही असा दावा पुन्हा एकदा केला.

आणखी वाचा

इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
Embed widget