ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 25 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 25 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता,
फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार, काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची महिला आणि बालकल्याण खात्याची माहिती.
एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा आरोप, गंभीर दखल घेत फडणवीस म्हणाले मुख्य सचिवांशी बोलणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें घेणार पत्रकार परिषद....
फडणवीस सरकारमधील फिक्सर दलाल पीए-पीएस बाळगणारे मंत्री कोण, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.. पीएंच्या सव्वाशे शिफारशींपैकी १०९ नावे क्लिअर केल्याची फडणवीसांची माहिती
राज्याच्या तिजोरीची लूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखली, संजय राऊतांकडून फडणवीसाचं कौतुक.. फडणवीस कठोर निर्णय घेतात, म्हणून मतभेद असतानाही जाहीर अभिनंदन
फडणवीसांकडे दलाल-फिक्सर पीएंची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेचेच, ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल.. शिंदेचा पक्ष म्हणजेच अमित शाहांचा पक्ष असल्याचाही घणाघात
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीला आज पुन्हा पुढची तारीख.. चार मार्चला सुनावणी घेण्याची पक्षकारांची विनंती, कोर्टाचा फैसला सायंकाळी..























