एक्स्प्लोर

Ranveer Allahbadia Statement Controversy Case: माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...

Ranveer Allahbadia Statement Controversy Case: रणवीर अलाहाबादियानं पोलिसांना सांगितलं की, समय रैना त्याचा मित्र आहे, त्यामुळे त्यानं त्याच्या 'इंडियाज़ गॉट लेटेंट' शोमध्ये हजेरी लावली होती.

Ranveer Allahbadia Statement Controversy Case: 'इंडियाज़ गॉट लेटेंट' (India's Got Latent) शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं (YouTuber Ranveer Allahabadia) नाही, नाही म्हणता म्हणता अखेर आपला जबाब महाराष्ट्र सायबर सेलच्या (Maharashtra Cyber ​​Cell) मुख्यालयात जाऊन नोंदवला. यावेळी माध्यमांचे कॅमेरे पाहून रणवीरनं तोंड लवपून पळ काढल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता रणवीरनं सायबर सेलसमोर नोंदवलेल्या जबाबात तपास अधिकाऱ्यांसमोर आपली चूक मान्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, 'इंडियाज़ गॉट लेटेंट'मध्ये आई-वडिलांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियावर चोहीकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी त्याच्या आणि शोविरोधात अनेक एफआयआरही दाखल करण्यात आल्या होत्या. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर अलाहाबादियानं पोलिसांना सांगितलं की, समय रैना त्याचा मित्र आहे, त्यामुळे त्यानं त्याच्या 'इंडियाज़ गॉट लेटेंट' शोमध्ये हजेरी लावली होती. तसेच, पुढे बोलताना ज्या वक्तव्यावरुन सध्या वाद सुरू आहे, ते बोलणं माझी चूक होती, असंही रणवीर अलाहाबादिया म्हणाला आहे.  रणवीरनं महाराष्ट्र सायबर सेलला दिलेल्या जबाबात आपला गुन्हा कबूल केला आहे आणि माझ्याकडून चूक झाली, असं म्हणत आपली चूकही त्यानं मान्य केली आहे. 

रणवीर अलाहाबादियानं पुढे बोलताना हेदेखील सांगितलं आहे की, त्यानं 'इंडियाज़ गॉट लेटेंट'च्या एपिसोडमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतलेले नव्हते. तसेच, रणवीरनं पोलिसांना सांगितलं की, आम्ही युट्यूबर आहोत आणि याचमुळे एकमेकांच्या शोमध्ये मैत्रिखातर हजेरी लावतो. 

प्रकरण नेमकं काय?

युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या रणवीर अलाहाबादिया 'इंडियाज़ गॉट लेटेंट' शोमध्ये विचारलेल्या एका प्रश्नामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याला बीअरबायसेप्स नावानं ओळखलं जातं. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये दिसून आला होता. ज्यामध्ये त्यानं स्पर्धकांना त्याच्या आई-वडिलांबाबत एक अश्लील प्रश्न विचारला. रणवीरचा हा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैनाही थक्क झाला होता. लगेचच त्यानं रणवीरच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत, हा काय मूर्खपणा आहे, अशी विचारणाही केली. रणवीरच्या प्रश्नानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ranveer Allahbadia Statement Controversy Case: ना ना, हो हो करता करता अखेर रणवीर अलाहाबादियानं सायबर सेलसमोर जबाब नोंदवला; मीडियाचे कॅमेरे पाहून तोंड लपवलं VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
Diljit Dosanjh on CJP Student Protest: शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
Embed widget