
राजकीय कार्यक्रम सुरु मग तमाशाच का बंद? तमाशा कलावंतांचा संतप्त सवाल
Coronavirus : राज्यात सध्या सर्वांना मुभा आहे मग तमाशा कलावंतांवर अन्याय का? निवडणुका, प्रचार, जल्लोष चालतो मग तमाशा का चालत नाही? असा सवाल यावेळी तमाशा कलावंतांकडून करण्यात आला.

पिंपरी चिंचवड : राज्यातील तमाशा कलावतांनी अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात तमाशा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी तमाशा कलावंतांनी केली आहे. राज्यात सध्या सर्वांना मुभा आहे मग तमाशा कलावंतांवर अन्याय का? निवडणुका, प्रचार, जल्लोष चालतो मग तमाशा का चालत नाही? असा सवाल यावेळी तमाशा कलावंतांकडून करण्यात आला.
जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्या घरात ही पत्रकार परिषद पार पडली. त्यानंतर तमाशा फड मालकांनी अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात सध्या सर्वांना मुभा आहे मग तमाशा कलावंतांवर अन्याय का? निवडणुका, प्रचार, जल्लोष चालतो मग तमाशा का चालत नाही? अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेने असे प्रश्न उपस्थित केले. नारायणगावमध्ये अध्यक्ष रघुवीर खेडकर, उपाध्यक्षा मंगला बनसोडे आणि राज्यातील सर्व फड मालक या वेळी उपस्थित होते.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे सलग दोन वर्षे गावोगावच्या यात्रा बंद होत्या. त्यामुळे तमाशांना मागणीच नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यात्रा गर्दीने फुलतील, तमाशा फडाच्या सुपाऱ्या मिळतील अशी आशा या कलाकारांना आहे. पण तमाशावरील बंदी मात्र उठत नाहीये, त्यामुळे राज्यातील तमाशा कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तमाशा बंद असल्याने तमाशा फडातील बरच साहित्य खराब देखील झाले आहे. पाठोपाठच्या संकटाने या मागील दोन वर्षात काहीच रक्कम शिल्लक नसल्याने पुन्हा हा फड उभा करण्याची आणि आणि तमाशाचे अस्तित्व टिकवण्याची लढाई सुरू आहे. तमाशा सारखी ही कला, वारसा या संकटात लुप्त होऊन द्यायचा नसेल तर या कलेला पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक आधार देणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Police : ट्राफिक पोलिसांच्या भ्रष्टाचाराविरोधात एका पोलिसाचीच हायकोर्टत जनहित याचिका
- दिवसाला विना मास्क फिरणाऱ्या 100 जणांवर कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे मुंबई पोलिसांना टार्गेट
- सार्वजनिक सुट्टी मागणं हा नागरीकांचा कायदेशीर अधिकार नाही : हायकोर्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
