एक्स्प्लोर

Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला

Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या अनावरणाप्रसंगी अनेक क्रिकेटपटू आणि राज ठाकरे कार्यक्रमात एकत्र आले होते.

मुंबई : क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या अनावरण प्रसंगाच्या निमित्तानं त्यांनी घडवलेले अनेक खेळाडू एकत्र आले होते. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील गेट 5 नंबर जवळ स्मारकाची उभारणी करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बलविंदरसिंग सिंधू, संजय बांगर, विनोद कांबळी यांच्यासह इतर दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट 

या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर मंचावर गप्पा मारत उभे होते. यावेळी विनोद कांबळी देखील मंचावर आला. विनोद कांबळी मंचावर आलेला पाहताच सचिन तेंडुलकरनं राज ठाकरे यांच्यासोबतची चर्चा थांबवली. राज ठाकरेंच्या परवानगीनं सचिन तेंडुलकरनं विनोद कांबळी जवळ जात त्याची विचारपूस केली. सचिन तेंडुलकर सोबतच्या भेटीनं विनोद कांबळी देखील आनंदी  झाल्याचं पाहायला मिळाली. दोघांनी गळाभेट घेतल्याचं पाहायला मिळालं.  

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटलं की क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांना क्रिकेटचं मॅन्युअल म्हटलं जायचं. कारण त्यांनी क्रिकेटची बाराखडी शिकवली.मुंबई क्रिकेटच्या तीन पिढ्या रमाकांत आचरेकर यांनी घडवल्या, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी रमाकांत आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंना दिशा दाखवली, असं म्हटलं. सरांनी केवळ क्रिकेटपटूच नाही गुणी प्रशिक्षकांची फौज निर्माण केली.रमाकांत आचरेकर उत्तम माणूस होते, असं  राज ठाकरेंनी म्हटलं.

रमाकांत आचरेकर यांचं स्मारक यापूर्वीच व्हायला हवं होतं, असं राज ठाकरे म्हणाले. जगात आचरेकर सरांनी भारतासाठी जेवढे खेळाडू तयार केले तितके खेळाडू इतरांनी तयार केले असं वाटत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. 

आपल्याकडे सर्वात मोठा रस्ता आहे दादर टी टी त्याचं नाव महात्मा गांधी रस्ता आहे. पण, महात्मा गांधी यांचे गुरु होते त्यांच्या नावावर असलेला गोखले रोड किती मोठा आहे ? आपल्याकडे गुरुला तितकसं महत्त्व दिलं जात नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

रमाकांत आचरेकर सरांनी कधीच वेल प्लेड म्हटलं नव्हतं. आम्ही चुका सुधारु शकलो तर पुढं जाऊन काही तरु करु शकतो, असा विचार ते करायचे, असं सचिन तेंडुलकरनं म्हटलं. यावेळी सचिन तेंडुलकरनं रमाकांत आचरेकर सरांच्या इतर आठवणी सांगितल्या. 

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 3 PM Top Headlines 3 PM 29 March 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12.30 PM TOP Headlines 12.30 PM 29 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Nashik Crime : जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम,थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर, जाणून घ्या सविस्तर
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...,1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर
Embed widget