एक्स्प्लोर
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदासाठी 800 फूट उंच नागफणी कड्यावर बॅनर
अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मावळातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले आहे. 800 फुटांवरुन झळकावला तीस फुटी बॅनर.

Ajit Pawar
1/7

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे.
2/7

अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
3/7

पुणे जिल्हातील लोणावळा लगतच्या नागफणी कडा चढाईला अतिशय दुर्गम व कठीण आहे. असा हा कठीण असलेला ड्युक्स नोज उर्फ नागफणी कड्यावर हा बॅनर झळकावला आहे.
4/7

गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते.
5/7

विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळावे हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे.
6/7

या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, विशाल गोपाळे, अजित गोपाळे व पांडुरंग जाचक यांनी सहभाग घेतला होता.
7/7

या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करीत यशस्वीरीत्या चढाई करतात.
Published at : 02 Dec 2024 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
हिंगोली
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion