Jankar vs Satpute : हट्ट सोडला, संघर्ष टळला; Karadwadiत घटनात्मक पेच थोडक्यात टळला Special Report
माळशिरसमधून पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर निवडून आले.. मात्र मारकडवाडीत ईव्हीएमवर झालेले मतदान चुकीचे असल्याचा त्यांनी आरोप केला.. तेवढ्यावरच न थांबता कायदेशीर प्रक्रियेला न जुमानता, मतपत्रिकेवर मतदानाचं नियोजन त्यांनी केलं. अखेर आज सकाळी त्यांनी आपला निर्णय बदलला आणि एक मोठा घटनात्मक पेच टळला. पाहूयात काय घडलं मारकडवाडीत?+
राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकरणावर आपली लेखी स्पष्टीकरण दिलं.
- मारकडवाडीतील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीने पूर्ण केली .
- मारकडवाडीतील ९६,९७, ९८ या तिन्ही बूथचं मतदान आणि मतमोजणीत कोणतीही विसंगती आढळली नाही.
- मतदान ते मतमोजणी प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीला सहभागासाठी कळवले होते.
- मतदानावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी पोलिंग एजंट उपस्थित होते, त्यांच्याकडून कोणीही तक्रार केली नाही.
- मतमोजणीवेळी उमेदवारांचे काऊंटिंग एजंट उपस्थित होते, त्यांनी तक्रार किंवा आक्षेप घेतला नाही
- मतदान, मतमोजणी , निकाल प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी, विसंगती आढळली नाही.