तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
वर्षा निवसास्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तब्बल 6 दिवसानंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेत.
Devendra Fadnavis Meets Eknath Shinde : वर्षा निवसास्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तब्बल 6 दिवसानंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दिल्लीत झालेल्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होत आहे. दिल्लीत 26 नोव्हेंबरवा या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर प्रथमच दोघेजण भेटले. दरम्यान, या भेटीत एकनाथ शिंदे यांच्या तब्बेतीची विचारपूस आणि संभाव्य मंत्रिमंडळात वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस आणि एकनवाथ शिंदे यांच्यातील ही भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, थोड्यावेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली होती. यावेळी उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, गिरीश महाजन अद्याप वर्षा निवासस्थानातून बाहेर पडले नाहीत. तोपर्यंतच देवेंद्र फडणवीस देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यामुळं या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. संभाव्य खातेवाटपावर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
संभाव्य खातेवाटपावर चर्चा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा (Mahayuti Oath Ceremony) पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी केली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, मंत्रीपदाची संधी कोणा कोणाला मिळणार याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक इच्छुकांनी मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती मिळत आहे.
भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंआहे. उद्या बाजपचा गटनेता निवडण्यात येणार आहे. सकाळपासून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी अनेक नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. अनेक जणांकडून मंत्रीपदासाठी लॉबिंग लावत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं फडणवीस हेच मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अशातच देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहे. राजकीय वर्तुळात वेगानं घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. खाते वाटपासंदर्भात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फडणवीस यांची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
वर्षा निवासस्थानी घडामोडींना वेग, एकनाथ शिंदेंची 'या' महत्वाच्या नेत्यांबरोबर बंद दाराआड चर्चा, संभाव्य खाते वाटपावर चर्चा?