एक्स्प्लोर

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 

क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते, असा मिश्किल टोला लगावत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदान परिसरात आचरेकर सरांचं स्मारक अनावरण सोहळ्यात भाष्य केलंय. 

Raj Thackeray मुंबई : क्रिकेटमध्ये जसं सगळं बदलत गेलं, तसंच आमच्या राजकारणात देखील बदल झाले आहेत. क्रिकेटमध्ये अंपायरनी आऊट दिल्यावर तो थर्ड अंपायर असतो. मला वाटतं गेल्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला देखील थर्ड अंपायर मिळाला असता तर कदाचित अनेक निकाल बदलले असते. मात्र आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही देखील काही करू शकलो नाही. असा मिश्किल टोला लगावत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय. 

क्रिकेटचे गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांची आज 92 वी जयंती आहे. या दिवसाचं औचित्य साधून मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या शिवाजी पार्क मैदान परिसरात आचरेकर सरांचं एक स्मारक उभारण्यात आलंय. गेट नंबर 5 जवळ उभारलेल्या या स्मारकाचं अनावरण आचरेकर सरांचा सर्वात आवडता शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या आचरेकर सरांच्या माजी विद्यार्थ्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती. हे स्मारक उभारण्याची संकल्पना राज ठाकरे यांचीच. त्यामुळे इथं सरांचा पुतळा उभारण्याऐवजी क्रिकेटचं दर्शन घडवणारं एक अनोख स्मारक उभारण्यात आलंय. ज्यात दिग्गज क्रिकेटर्सची स्वाक्षरी असलेली बैट, स्टम्प्स, ग्लोव्हज आणि आचरेकर सरांची ओळख असलेली त्यांची रोमिओ हैट बसवण्यात आलीय. या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. 

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

खऱ्या अर्थाने हे स्मारक या आधीच व्हायला पाहिजे होतं. कारण रमाकांत आचरेकर सर म्हटले की सचिन तेंडुलकर हे नाव समोर येतं. कारण मला वाटत नाही की भारतात आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू तयार केले तेवढे एखाद्या कोचणी तयार केले असतील, असे मला वाटत नाही. ज्यावेळेस आपल्या देशात, राज्यात फ्लाय ओवर्स, महामार्ग इत्यादी सारख्या अनेक गोष्टी तयार होत असताना तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना अशा लोकांची नावे दिली पाहिजेत. आपल्या इथे असलेला सर्वात मोठा रस्ता हा महात्मा गांधींच्या नावाने आहे. मात्र महात्मा गांधींचे जे गुरु आहेत गोपाळ कृष्ण गोखले तो आमचा गोखले रोड आहे.  गुरु नावाची काय व्यक्ती असते? काय परंपरा असते? ही गोष्ट आपल्याकडे नाहीचं. 

ज्यावेळेस दहावी-बारावीचे विद्यार्थी माझ्याकडे येत असतात त्यावेळी मी त्यांना विचारत असतो की पुढे काय करायचे आहे? त्यावर ते वेगवेगळी उत्तर देतात. मात्र एकही विद्यार्थी असे म्हणत नाही की मला शिक्षक व्हायचे आहे. देशात मुलांना शिक्षक व्हावेसे वाटत नाही, या देशाचा पुढे काय होईल, हे मला कळत नाही. आचरेकर सरांच्या घरी सचिन तेंडुलकर दरवर्षी नं चुकता नमस्कार करायला आणि आशीर्वाद घ्यायला यायचे. आमच्याकडे गुरुपौर्णिमा ही केवळ मोबाईल पुरती आणि मेसेज पुरती मर्यादित राहिली आहे. गुरु नावाची जी व्यक्ती असते ती जोपासणे  महत्त्वाचं आहे. 

आचरेकर सरांचे योगदान एवढे मोठे आहे की त्यांच्या नावे एखादा स्मारक व्हावं, काहीतरी मोठं कार्य व्हावं, असं मला मनापासून वाटत होतं. त्यासाठी मी अनेक लोकांसोबत बोललो होतो.  मात्र मला आचरेकर सरांचा पुतळा नको होता. आपल्याकडे पुतळे भरपूर झाले आहेत. त्यामुळे मी वेगळी कल्पकता वापरून स्मारका ऐवजी  जिथे स्टम्प आहेत,ग्लोज आहे बॅट बॉल आहेत, यासह आचरेकर सरांची  सरांची टोपी आहे. ती कॅप आचरेकर सरांची खास ओळख होती, त्याचे स्मारक केलं. असे ही राज ठाकरे म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजीSachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावलाABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
Embed widget