Maharashtra Kesari Pune: महाराष्ट्र केसरीचा थरार! 'हे' आहेत आतापर्यंतचे विजेते 'गदा'धारी मल्ल
पुण्यात दिमाखात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात 1961साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे.

Maharashtra Kesari 2023 Pune: पुण्यात दिमाखात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला (Maharashtra kesari 2023) सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. महाराष्ट्र पोलीस बँडने यावेळी मानवंदना दिली. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 45 संघ आणि 900 हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरणार आहे. यासाठी कुस्ती शौकिनांनी केलेली गर्दी करतील. या स्पर्धेची सुरुवात 1961साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे.
हे आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते..
1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)
2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962),
3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964),
4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965),
5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966),
6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976),
7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968),
8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969),
9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070),
10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071),
11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972),
12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973),
13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974),
14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975),
15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976),
16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978),
17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979),
18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980),
19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981),
20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982),
21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983),
22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984),
23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985),
24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986),
25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987),
26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988),
27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992),
28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993),
29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95),
30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96),
31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97),
32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98),
33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99),
34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000),
35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001),
36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02),
37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03),
38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04),
39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05),
40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06),
41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007),
42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008),
43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009),
44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010),
45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011),
46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012),
47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013),
48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014),
49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015),
50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016),
51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017),
52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017),
53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019),
54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22),
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
