Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, देवेंद्र फडणवीस, शरद पवारांचीही उपस्थिती
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: मराठी साहित्याचा (Marathi Sahitya) महामेळा राजधानी नवी दिल्लीत (New Delhi) आजपासून सुरू होणार आहे. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Inauguration) आज दिल्लीत (Delhi News) पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) हस्ते होईल. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दिल्लीत होत आहे. शरद पवार (Sharad Pawar) या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर मुख्यमंत्री (CM Devendra Fadnvis) प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhavalkar) या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. सरहद या संस्थेनं संमेलनाचं आयोजन नवी दिल्लीत केलंय. आज दुपारी साडेतीन वाजता दिल्लीत विज्ञान भवनात संमेलनाला सुरूवात होईल. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान विविध साहित्यिक कार्यक्रम या संमेलनात होतील. संमेलनासाठी दोन कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारने मंजूर केलाय. साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दरवर्षी दोन कोटींचं अर्थसहाय्य करतं. मात्र दिल्लीतील खर्च लक्षात घेऊन अधिक निधीची महामंडळाची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
मोदी-पवार-फडणवीस एकाच मंचावर
दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. तर, डॉ. तारा भावळकर संमेलनाध्यक्ष तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
संसदेपासून ग्रंथदिंडीस काढण्यास परवानगी
साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडी निघते. यंदा या ग्रंथदिंडीस संसदेपासून प्रारंभ व्हावा, अशी आयोजकांची इच्छा होती. त्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पाहार अर्पण करून ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. नंतर ही दिंडी तालकटोरा मैदानाकडे जाईल. संसदीय सचिवालय व सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या CISF नं ग्रंथदिंडीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना या परिसरात प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे.
नेतेमंडळींची साहित्य संमेलनाला विशेष उपस्थिती
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशीष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित संमेलनात उपस्थिती नोंदविणार आहेत.
1200 साहित्यिक विशेष एक्सप्रेसनं दिल्लीला रवाना
1200 साहित्यिक विशेष एक्सप्रेसनं दिल्लीला जाणार आहेत. मराठी भाषा विभागानं हा निर्णय घेतला आहे. एक्सप्रेसमध्येही साहित्य संमेलन रंगणार असून एक्सप्रसेच्या बोगीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एक्सप्रेसला महापराक्रमी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

