Karuna Sharma Munde: वाल्मिक कराडने मला बाथरुमला येईपर्यंत मारलं, आता तुरुंगात सडतोय, धनंजय मुंडेंवरही तीच वेळ येईल: करुणा मुंडे
Dhananjay Munde and Karuna Munde: न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना प्रत्येक महिन्याला खर्चासाठी पैसे देण्याच्या सूचना केल्या होत्या.

मुंबई: वाल्मिक कराड याने मला काही महिन्यांपूर्वी बाथरुमला येईपर्यंत मारलं होतं. पण आता तुरुंगात सडत आहे. तो आता आयुष्यभर तुरुंगातच सडणार आहे, असे वक्तव्य करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde) यांनी केले. वाल्मिक कराड हा दोन पैशांची किंमत नसलेला गुंड आहे. त्याने मला आठ महिन्यांपूर्वी मारले होते. मला बाथरुमला येईपर्यंत तो मला मारत होता. ते म्हणतात ना या राजकारण्यांनी न्याय केला नाही तर देव न्याय करेल. वाल्मिक कराड (Walmik Karad) याने मला मारुन आठ महिनेही झाले नसतील आता तो जेलमध्ये सडतोय. त्याच्यासोबत लवकरच धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) तुरुंगात जातील. कारण हे सगळं जे कटकारस्थान आहे, लोकांची जमीन हडपण्याचा प्रकार असो, महिलांवर अत्याचार करणे असो या सगळ्यांचे पुरावे मी देणार आहे. मी याविरोधात आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळही मागितली आहे, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.
करुण शर्मा मुंडे यांनी गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. याबाबत बोलताना सांगितले की, माझ्या गाडीत कशाप्रकारे रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आली. तीन वर्षांसाठी पोलिसांचा गैरवापर करुन मला तुरुंगात टाकायचा प्रयत्न झाला. अजित पवार गटात भ्रष्ट मंत्री बसले आहेत. ते मला दाखवायचे आहे, याबाबत मी सुप्रिया सुळे यांना सांगितले. धनंजय मुंडे यांनी पुण्यातील ज्या लोकांची जमीन खाल्ली आहे, त्यांना घेऊन मी सुप्रिया सुळे यांच्याकडे गेले होते. सुप्रिया सुळे यांनी या सगळ्याचा पाठपुरावा करण्याचे आणि मला मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.
करुणा मुंडेंकडून 'त्या' सीसीटीव्ही फुटेजची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीची बैठक होती. त्यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे उपस्थित होत्या. तिकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे होते. तिकडे मला पोलिसांसमोर वाल्मिक कराडने मला मारले. ते सीसीटीव्ही फुटेज धनंजय मुंडेंनी पोलिसांच्या वापर करुन मला मिळून दिले नाही, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.
शरद पवारांनी मला 4 ते 5 वेळा फोन करून बोलावले होते: करुणा मुंडे
धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच झाला असता. कारण शरद पवारांनी मला 4 ते 5 वेळा फोन करून बोलवलं होतं. परंतु अजित पवारांनी काही तरी केलं आणि शरद पवार साहेबांनी मला वेळ दिला नाही, असा दावा करुणा मुंडे यांनी केला. यापूर्वी करूणा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील धनंजय मुंडे यांना वाचवत असल्याचा दावा केला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
