एक्स्प्लोर

Sourav Ganguly Car Accident: सौरव गांगुलीच्या कारचा अपघात, समोरुन ट्रक आला मागून कारची धडक, दादा थोडक्यात वाचला

Sourav Ganguly : भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीच्या कारचा पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी अपघात झाला. यामध्ये गांगुली थोडक्यात बचावला. 

कोलकाता : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्या कारचा गुरुवारी (20 फेब्रुवारी) रोजी अपघात झाला. या कार अपघातातून सौरव गांगुली थोडक्यात वाचला आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर एक्स्प्रेस वे वर हा अपघात झाला. या अपघातात गांगुलीला दुखापत झाली नाही. 

सौरव गांगुली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बर्दवानला निघाला होता. दुर्गापूर एक्स्प्रेस वे वर दंतनपूर येथे त्यांच्या ताफ्यासमोर एक ट्रक अचानक आला. त्यामुळं सौरव गांगुलीच्या कारच्या ड्रायव्हरनं अचानक ब्रेक दाबला.  यामुळं त्यांच्या मागं असलेल्या कारच्या चालकांनी देखील अचानक ब्रेक लावले. मात्र, यामुळं वाहनं एकमेकांना धडकली. यापैकी एक गाडी सौरव गांगुलीच्या कारला धडकली. 

सौरव गांगुलीला या घटनेत दुखापत झाली नाही त्याप्रमाणं ताफ्यातील इतर व्यक्तींना देखील दुखापत  झाली नाही. मात्र, गांगुलीला घटनास्थळावर  10 मिनिटे थांबावं लागलं. सौरव गांगुलीच्या ताफ्यातील दोन वाहनांचं अधिक नुकसान झालं आहे. या ठिकाणी थोडा वेळ थांबल्यानंतर सौहव गांगुली पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला. गांगुली बर्दवान विद्यापीठातील कार्यक्रमात सहभागी झाला. 

सौरव गांगुली हा भारताचा आक्रमक कॅप्टन म्हणून ओळखला जातो. गांगुलीच्या कार्यकाळात भारतानं विदेशात मोठ्या संख्येनं सामने जिंकण्यास सुरुवात केली. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. सौरव गांगुलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11363 धावा केल्या. वनडेमध्ये त्याच्या नावावर 22 शतकं आणि 52 अर्थशतकं आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं सात हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. 

सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2003 मध्ये गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं वनडे वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली होती. तर, त्यानं काही काळ बीसीसीआयचा चेअरमन म्हणून काम केलं आहे. 

सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणून आक्रमक शैली वापरली. यामुळं विदेश दौऱ्यावर असताना जिथं जिथं भारताला पराभव स्वीकारावा लागायचा तिथं संघानं विजय मिळवून दाखवले. सौरव गांगुली नंतर बीसीसीआयमध्ये चेअरमन देखील होता. सौरव गांगुलीच्या काळात अनेक दिग्गज क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटमध्ये पुढं आले. गांगुलीनं त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडून चांगली कामगिरी करुन घेतली.

इतर बातम्या : 

Rohit Sharma : रोहित शर्मानं कॅच सुटल्यानंतर मैदानावर हात जोडले, मॅच संपताच अक्षर पटेलला मोठी ऑफर, म्हणाला...

Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: "आजपासून दोघेही पती-पत्नी नाहीत..."; वांद्र्यातील फॅमिली कोर्टात युजवेंद्र चहल, धनश्री वर्माचा घटस्फोट, युझीनं किती पोटगी दिली?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Accident: हँडब्रेक ओढल्याने भीषण अपघात, दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू!
Maharashtra Rains: 'कर्जबाजारी शेतकऱ्यांनी काय करायचं?', Buldhana त अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं!
On Ground Check: 'मदत पोहोचली का?' CM Fadnavis यांच्या पॅकेजनंतर Uddhav Thackeray थेट शेतकऱ्यांच्या बांधावर.
Beed Politics: 'त्यांना काय लक्ष घालायचं ते घालू द्या', Pankaja Munde यांना Suresh Dhas यांचं प्रत्युत्तर
Yavatmal Accident:'देवदूत' बनून आला प्रसंगावधान! भरधाव ट्रक दुकानात घुसला, एकाचा जीव थोडक्यात बचावला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
Nashik Politics: पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
India Women vs South Africa Women, Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
केन विल्यम्सनच्या तडकाफडकी निर्णयानं भूवया उंचावल्या! टी-20मध्ये न्यूझीलंडला दोनदा सेमीफायनल अन् एकदा फायनल गाठून दिली!
केन विल्यम्सनच्या तडकाफडकी निर्णयानं भूवया उंचावल्या! टी-20मध्ये न्यूझीलंडला दोनदा सेमीफायनल अन् एकदा फायनल गाठून दिली!
Crime News: 15 वर्षांच्या मुलाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने वार करून संपवलं; गर्भवती वहिनीसोबत नको ते केलं, आईनंही केली मदत, पुरलेले मृतदेह...
15 वर्षांच्या मुलाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने वार करून संपवलं; गर्भवती वहिनीसोबत नको ते केलं, आईनंही केली मदत, पुरलेले मृतदेह...
Embed widget