एसटी आंदोलनामुळं 600 कोटींचं नुकसान; ST खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या : अनिल परब
ST आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब (ANIL PARAB) यांनी म्हटलं आहे.

सोलापूर : राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (Maharashtra ST Protest) अजूनही सुरुच आहे. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. आता महामंडळानं एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे 55 हजार संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज सोलापुरात महत्वाची माहिती दिली आहे. एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास 600 कोटींचे नुकसान झाले आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे, असं परब म्हणाले. मी स्वतः अनेक कर्मचाऱ्यांना भेटत आहे. त्यांना आवाहन करतोय. समिती या बाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे संप सुरू ठवण्याला अर्थ नाही. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे, असं ते म्हणाले. अनेक कर्मचारी आता रुजू झाले आहेत.मात्र जे कर्मचारी रुजू झालेले नाहीत त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो. एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असं ते म्हणाले.
परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसे आमचे दायित्व आहे तसे राज्याच्या बाबतीत देखील आमचे दायित्व आहे. आंदोलनामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. इतक्या वेळी आवाहन करून देखील जर ऐकणार नसतील कारवाई शिवाय पर्याय नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांची कारवाई मागे घेण्याचा प्रश्न येतच नाही. व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्हाला कर्मचारी भरती करावी लागेल, असंही ते म्हणाले.
माझा रिसॉर्टशी काहीही संबंध नाही
रिसॉर्टबाबतच्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी या आधी सांगितलेलं आहे..रिसॉर्ट ज्यांचा आहे त्यांना हा प्रश्न विचारा. राज्यसरकारकडे याच्या नोंदी आहेत. केंद्रीय संस्थांनी याची चौकशी केली आहे. माझा रिसॉर्टशी काहीही संबंध नाही. या आधी देखील अनेक चौकशी झाल्या. किरीट सोमय्या उगाच आरोप करत आहेत.. यांच्यामुळे त्यांच्या विरोधात मानहानी दाखल केली आहे. त्यांना मला 100 कोटी द्यावे लागेल अन्यथा माफी मागावी लागेल, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारत आहे
अनिल परब म्हणाले की, महाराष्ट्रवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंघावत आहे. मागच्या वेळी राज्याला खूप संकट आली, त्यासाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारत आहे. त्यांनी कामाला सुरुवात देखिल केली आहे. त्यांची तब्येत आधी सारखी ठणठणित व्हावी अशी प्रार्थना देखील देवीकडे केली आहे, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
