Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार; गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक; काँग्रेसची प्रतिक्रिया
Rahul Gandhi: मानहानीच्या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. तर आता राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

Rahul Gandhi Defamation Case: मानहानीच्या प्रकरणात सूरत कोर्टाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दोषी ठरवल्याचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) कायम ठेवला आहे. तसेच गुजरात उच्च न्यायालयाकडून राहुल गांधी यांनी दिलासा मिळाला नाही. पण आता राहुल गांधी हे सर्वेच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या याचिकेवर शुक्रवारी (7 जुलै) रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
काय म्हणाले अभिषेक मनु सिंघवी?
काँग्रेसेचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं की, आजचा निर्णय हा निराशाजनक आहे हे मी समजू शकतो पण हा निर्णय अनपेक्षित नाही. मागील 66 दिवसांपासून आम्ही या निर्णयाची वाट बघत होतो. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, हे प्रकरण फक्त राहुल गांधी या व्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देखील मुद्दा आहे.
हे सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सध्या सरकारकडून होत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. तसेच राहुल गांधी हे भाजपच्या खोट्याचं पितळं उघडं पाडतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. आता राहुल गांधी हे सर्वेच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचं काँग्रसेच पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना सर्वेच्च न्यायालयामध्ये दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राहुल जी सत्य की राह के निडर यात्री हैं और वो BJP के झूठ का पर्दाफाश करते रहेंगे।
— Congress (@INCIndia) July 7, 2023
इस तरह के पर्दाफाश से मोदी सरकार बौखलाई रहती है।
हमें विश्वास है कि सत्य की जीत होगी और इस अहंकारी सत्ता को अंत में कड़ा जवाब मिलेगा।
: @DrAMSinghvi जी pic.twitter.com/Zt1iacK35T
गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली राहुल गांधींची याचिका
मोदी आडनावामुळे मानहानी केल्याचा आरोप राहुल गांधी याच्यावर करण्यात आला होता. त्यावर सूरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती त्यामुळे त्यांची खासदारकी देखील रद्द झाली होती. पण या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यावर शुक्रवारी (7 जुलै) रोजी गुजरात हायकोर्टाने यावर निर्णय दिला आहे.
तसेच गुजरात हायकोर्टाने सूरत कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच त्यांची शिक्षा देखील तशीच ठेवली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे निलंबन देखील कायम राहणार आहे. सुरत न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी ही याचिका सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. पण गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं देखील म्हटलं जात आहे.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
