Beed News: वाल्मिक कराडचा मुक्काम असणाऱ्या बीड जिल्हा कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, तुरुंग कमकुवत झाल्याने निर्णय
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगचे गावकरी आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. तर दुसरीकडे वाल्मिक कराडला ठेवलेल्या तुरुंगाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे.
बीड: बीड जिल्हा कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. याच कारागृहात वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. बीडच्या जिल्हा कारागृहाचं (Beed Jail) स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. याच कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) संशयित आणि मकोका अंतर्गत कारवाई केलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याच कारागृहातील कोठडीत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच अनुषंगाने सोमवारी पोलीस अधीक्षकांची टीम याचा आढावा घेणार आहे. दहा ते बारा बाबींवर कारागृहाचे ऑडिट होणार आहे. बीड जिल्हा कारागृह निजामकालीन असून इमारत कमकुवत आहे. कारागृहातील सीसीटीव्हीचे नूतनीकरण करण्याचेच आहे. त्याबरोबरच सुरक्षा यंत्रणा देखील अद्यायावत गरजेचे असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग; आगीमध्ये जुने दस्ताऐवज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक
बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग लागली आहे. या आगीमध्ये जुने दस्तऐवज जाऊन खाक झाले असून अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेवराई पंचायत समिती कार्यालयात जुन्या इमारतीमध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये जुने दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहेत. या इमारतीत नरेगा घरकुल, बालविकास विभागाचे काम सुरू होते. त्यामुळे जुने दस्ताऐवज याच ठिकाणी होते. आगीत सर्व कागदपत्रे जळून खाक झाले आहे. ही आग नेमक्या कोणता कारणाने लागली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थांची आज बैठक
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मसाजोग ग्रामस्थांनी बैठक बोलावली आहे. सर्व ग्रामस्थ चर्चा करून ही बैठक घेणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 68 दिवस होत आहेत. मात्र यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र संपत्ती जप्त करण्यापेक्षा त्याला अटक करा. अशी मागणी देशमुख कुटुंबासह ग्रामस्थ करत आहेत. याबरोबरच पुढील निर्णय घेण्यासाठी बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे.
कोणत्या मुद्द्यावर नागरिक बैठक घेणार ?
* आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार त्याला तात्काळ अटक करावी
* आरोपींना सहकार्य करणाऱ्या बी टीमची चौकशी करून कारवाई करावी
* बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे
* न्यायालयात खटला चालू असताना उज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नेमणूक करावी
* संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही संदर्भात चौकशी करून पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी
* आरोपींना फरार होण्यासाठी आणि फरार असताना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करून त्यांना सहआरोपी करावे
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

