Earthquake Tremors in Delhi: राजधानी दिल्ली पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; साखरझोपेतील लोक खडबडून जागे, तीव्रता 4 रिश्टर स्केल
Earthquake Tremors in Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी मोजली गेली, त्याचे केंद्र दिल्लीच्या आसपास पृथ्वीपासून 5 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जाते.

Earthquake Tremors in Delhi: दिल्लीत आज (सोमवारी, 17) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के (Earthquake Tremors in Delhi) जाणवले. कित्येक सेकंद घरे, इमारती थरथरल्याचे जाणवत होते. भूंकपाच्या भीतीने लोक घाबरून घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 मोजली गेली (Earthquake Tremors in Delhi), त्याचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ पृथ्वीपासून 5 किलोमीटर खोलीवर होता.त्यामुळे जोरदार धक्के जाणवले. काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत जोरदार कंपने जाणवू लागली. पहाटे 5.36 वाजता भूकंप झाला, यामुळे काही लोक गाढ झोपेत असताना कंपन जाणवू लागल्याने घाबरून घराबाहेर पडले.(Earthquake Tremors in Delhi)
एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलतना सांगितले की, भूकंपाचा केंद्र धौला कुआन येथील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ होता. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणाच्या जवळ एक तलाव आहे. या प्रदेशात दर दोन ते तीन वर्षांनी एकदा लहान आणि कमी तीव्रतेचे भूकंप होत आहेत. 2015 मध्ये येथे 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दिल्ली-एनसीआर तसेच शेजारील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आणि खबरदारी म्हणून ते घराबाहेर पडले. सध्या कुठूनही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
Strong Earthquake tremors felt in Delhi-NCR pic.twitter.com/HtFYQWFDg2
— ANI (@ANI) February 17, 2025
पीएम मोदींनी केली पोस्ट
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आणि म्हटले की, 'दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या झोन IV मध्ये येते, ज्यामुळे मध्यम ते तीव्र भूकंपाचा धोका असतो. दिल्ली एनसीआरमध्ये वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, मात्र या तीव्रतेचे धक्के बऱ्याच दिवसांनी जाणवले आहेत. अनेक दशकांनंतर भूकंपाचा केंद्रबिंदूही दिल्लीजवळ आहे. कंप इतका जोरदार होता की, लोकांच्या घरातील बेड, पंखे आणि इतर वस्तू थरथरू लागल्या. घरांचे दरवाजे, खिडक्या सर्वच थरथरू लागले.
भूकंप का आणि कसे होतात?
भूकंप का आणि कसे होतात हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रवरूप लावा आहे आणि त्यावर टेक्टोनिक प्लेट्स तरंगतात. अनेक वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे, काही वेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा जास्त दाब असतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. तेव्हा भूकंप होतो.
तीव्रता कशी मोजली जाते?
भूकंप रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे, त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप 1 ते 9 पर्यंत त्याच्या केंद्रापासून म्हणजे केंद्रापासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित हे प्रमाण तीव्रतेचे मोजमाप करते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

