एक्स्प्लोर

29th July In History: भारताने हॉकीमधील शेवटचं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं, श्रीलंकेत शांततेसाठी राजीव गांधी-जयवर्धने करार; आज इतिहासात

29th July Important Events : 1987 साली भारतीय पतंप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष जयवर्धने यांच्यात एक करार झाला आणि भारताने शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला. 

29th July In History: 29 जुलैचा इतिहास भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाची आठवण करून देतो. एकेकाळी आशियातील पारंपरिक हॉकी संघ युरोपियन संघांसमोर नांगी टाकत असत तर दुसरीकडे भारतीय हॉकी संघाने 1928 ते 1956 दरम्यान ऑलिम्पिक खेळांमध्ये सलग सहा सुवर्णपदके जिंकली. याला भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ म्हणतात. नंतर आशियाई शैलीतील कलात्मक आणि कौशल्यपूर्ण हॉकीवरील सूर्य मावळू लागला आणि त्याची जागा अॅस्ट्रो-टर्फवर खेळल्या जाणार्‍या वेगवान पॉवर-पॅक हॉकीने घेतली. 29 जुलै 1980 रोजी झालेल्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 29 जुलै या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे,

1567 -जेम्स सहावा स्कॉटलंडचा राजा बनला.

1748 - ईस्ट इंडिया कंपनीला मदत करण्यासाठी ब्रिटीश सैन्याची पहिली लष्करी तुकडी भारतात आली.

1958 - नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) स्थापना.

1876 - सायन्स असोसिएशनची स्थापना.

1904 - टाटा समूहाचे संस्थापक जे. आर. डी. टाटा यांचा जन्म.

1911 - मोहन बागानने प्रथमच IF शील्ड जिंकले.

1937 - जपानी सैन्याने चीनमधील बीजिंग आणि तिएंसिन शहरे ताब्यात घेतली.

1946 - एअर इंडिया - टाटा एअरलाइन्सचे (Tata Airlines) एअर इंडिया (Air India) असे नामकरण झाले.

1949 - ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) रेडिओवर प्रसारण सुरू झाले.

1957 - संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA International Atomic Energy Agency) ची स्थापना केली.

1968 - पोप सहावा यांनी ख्रिश्चनांसाठी गर्भनिरोधकांच्या वापरावरील धार्मिक बंदी सुरू ठेवण्याची घोषणा केली.

1980 - हॉकीमध्ये भारताने शेवटचं ऑलिंम्पिक सुवर्णपदक जिंकलं

1928 ते 1956 दरम्यानच्या सलग सहा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताला (Indian Hockey Taem) पुढचे सुवर्णपदक जिंकण्यासाठी 1980 सालची वाट पाहावी लागली. भारताने त्या आधी 1968 आणि 1972 मध्ये कांस्यपदक जिंकले होते, तर 1976 च्या ऑलिम्पिकमध्ये संघ 7 व्या स्थानावर होता.

1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये  (Mosco Olympic) भारतीय संघ खूप दबावाखाली होता आणि त्यांचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. भारतीय संघाने टांझानियाचा 18-0 असा पराभव केला आणि नंतर क्युबाचा 13-0 असा पराभव केला. नंतर भारताने पोलंड आणि स्पेन सारख्या बलाढ्य संघांविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर उपांत्य फेरीत टीम इंडियाने रशियाचा 4-2 असा पराभव केला.

अंतिम फेरीत भारताचा सामना जबरदस्त फॉर्मात असलेल्या आणि भारताला कडवी झुंज देणाऱ्या स्पेनशी झाला. मोहम्मद शाहिदच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताने या सामन्यात चांगली कामगिरी केली आणि स्पेनला 4-3 असं हरवून सुवर्णपदक जिंकलं. भारताचे हे 8 वे आणि शेवटचे सुवर्णपदक ठरले.

1981 - प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचे सेंट पॉल कॅथेड्रल, लंडन येथे लग्न. जगातील 75 कोटी लोकांनी हे लग्न टेलिव्हिजनवर लाईव्ह पाहिले.

1982 - दिलीप बोसची डेव्हिस कप राष्ट्रांच्या व्यवस्थापनासाठी निवड झाली.

1987 - भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता करार, भारताने श्रीलंकेत शांतीसेना पाठवण्याचा निर्णय.

श्रीलंकेतील गृहयुद्ध आणि असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भारताने या प्रश्नी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन भारतीय पंतप्रधान राजीव गांधींना या प्रदेशात शांतता नांदावी असं वाटत होतं. त्यामुळे 29 जुलै 1987 रोजी त्यांनी श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष जयवर्धने (Rajiv Gandhi-Jayewardene Accord) यांच्यासोबत एक करार केला. हा करार भारत-श्रीलंका करार (India Srilanka Peace Accord) किंवा राजीव गांधी-जयवर्धने करार या नावाने ओळखला जातो. या करारांतर्गत भारताने श्रीलंकेत शांतता नांदावी यासाठी शांतीसेना (India Peace Keeping Force) पाठवायचा निर्णय घेतला. राजीव गांधींच्या याच निर्णयामुळे पुढे त्यांची हत्या करण्यात आली. 

भारतीय शांतीसेना तामिळ वंशाच्या लोकांविरोधात लढत होती. यामध्ये दोन्हीकडून नुकसान झालं ते भारताचंच. कारण एकीकडे श्रीलंकेतील तामिळ लोकांमध्ये भारतद्वेष निर्माण झाला होता आणि दुसरीकडे भारतीय जवानांची हत्याही होत होती. 

2002 - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे निधन.

2006 - श्रीलंकेचे फलंदाज महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 624 धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली.

2013 - फ्रान्समधील कान्स येथील हॉटेलमधून 103 दशलक्ष युरोच्या हिऱ्यांची चोरी.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonali Bendre Cancer : कॅन्सरवर मात, निसर्गोपचाराची साथ? सोनाली बेंद्रे  चर्चेत Special Report
MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण  राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद  टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget